Wednesday, July 3, 2024

अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘थलायवी’ चित्रपटाला मोठा धक्का; रिलीझ होताच घडला ‘हा’ प्रकार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत बऱ्याच दिवसांपासून तिच्या ‘थलायवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कंगनाचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट १० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु आता अशा बातम्या आल्या आहेत, ज्यामुळे कंगना आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना धक्का बसू शकतो.

असे सांगितले जात आहे की, हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. कंगना रणौत आणि निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी कंगनाने तब्बल २० किलो वजन वाढवले ​​होते. चाहत्यांचा असा विश्वास आहे की, चित्रपटाची खरी मजा ही मोठ्या पडद्यावर पाहण्यातून येणार आहे. अशा परिस्थितीत सिनेमाचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी पायरेटेड आवृत्तीकडे नव्हे, तर मोठ्या पडद्याकडे वळत आहेत. ( Actress Kangana Ranaut’s film ‘Thalayavi’ increased the tension of the producers)

चित्रपटामुळे कंगनाचे जोरदार कौतुक होत आहे
हा चित्रपट कंगनाच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट म्हटले जात आहे. कंगनाची मेहनत या चित्रपटातून स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियावरही चाहते कंगनाचे थलायवीसाठी सतत कौतुक करत आहेत. हा चित्रपट तमिळनाडूच्या पाच वेळा मुख्यमंत्री असलेल्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी अगदी लहान वयातच तमिळ चित्रपटसृष्टीत अभिनय कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर कमी कालावधीत, त्यांनी एक उच्च स्थान देखील प्राप्त केले होते. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त, ‘थलायवी’ हा तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.

कंगनाबद्दल थोडक्यात
अभिनेत्री कंगना रणौतने वयाच्या १६ व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. थिएटर दिग्दर्शक अरविंद गौर यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर, कंगनाने २००६ च्या थ्रिलर ‘गँगस्टर’ चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ… मेट्रो’ आणि ‘फॅशन’ या चित्रपटातून तिच्यावर कौतुकाचा पाऊस पडला. त्यानंतर कंगना ‘राज: द मिस्ट्री कंटिन्यूज’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ मध्ये दिसली. परंतु यामध्ये तिच्या भूमिकेवर टीका झाली. ‘तनू वेड्स मनू’मधील तिची कॉमिक भूमिका चांगली गाजली.

‘क्रिश ३’ या सायन्स फिक्शन चित्रपटात काम केले, जो सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. त्यानंतर कॉमेडी चित्रपट ‘तनू वेड्स मनू: रिटर्न्स’ मध्ये दुहेरी भूमिका साकारली. याव्यतिरिक्त तिने ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ आणि क्रीडा चित्रपट ‘पंगा’मध्ये कबड्डी खेळाडूची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा