Saturday, March 2, 2024

काय सांगता! कंगना रणौत दिसते मधुबाला सारखी? हे आम्ही नाही तर खुद्द पंगा क्वीनच म्हणते, आता तुम्हीच पाहा आणि ठरवा

मधुबाला हिंदी सिनेमाला पडलेले एक सुंदर स्वप्न. त्यांच्याशिवाय या सिनेसृष्टीचा इतिहास निव्वळ अपूर्णच. अतिशय सुंदर आणि देखण्या अशा मधुबाला यांच्या सौंदर्याची आजही भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. मधुबाला यांनी अतिशय उत्तम चित्रपटांमध्ये काम केले. त्या आज या जगात नसल्या तरी त्यांची आणि त्यांच्या सौंदर्याची नेहमीच आठवण काढली जाते. त्यांच्यासोबत एखाद्या अभिनेत्रीची तुलना कधी होऊच शकत नाही, आणि जरी थोड्या फार फरकाने झाली तरी त्यात अपूर्णता असतेच. मात्र आता बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने स्वतःची तुलना मधुबाला यांच्याशी केली आहे.

बॉलिवूडमध्ये चित्रपटांसोबत आपल्या व्यक्तव्यांमुळे चर्चेत असणारी पंगा क्वीन सध्या खूपच गाजत आहे. तिने नुकतीच सोशल मीडियावर तिची आणि मधुबाला यांची तुला करत ती मधुबाला यांच्यासारखी दिसत असल्याचे सांगितले आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे आणि मधुबाला यांचे काही फोटो कोलाज करून पोस्ट केले आणि लिहिले, “मी चित्रपटामध्ये मधुबाला यांची भूमिका साकारावी असे बऱ्याच लोकांना वाटत आहे. जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती, तेव्हा मी मधुबाला जशा तरुणपणात दिसायच्या अगदी तशीच दिसायचे. मात्र मी अजूनही याबाबत ठाम नाही.” यानंतर तिने तिचा एक कला ड्रेस घातलेला फोटो शेअर केला आणि लिहिले, “हे देवा, सिनेसृष्टीमधले हे माझे पहिलेच वर्ष होते.” या फोटोंमध्ये कंगनाची फॅशनही खूपच वेगळी दिसत आहे.

तत्पूर्वी मधुबाला यांची नुकतीच 91 वी जयंती साजरी झाली. मधुबाला यांनी खूप कमी वयात मोठे यश मिळवत नाव कमावले. मात्र दुर्दैवाने त्यांनी या जगाचा निरोप खूपच लवकर घेतला. मधुबाला यांची कारकीर्द अनेक गोष्टींमुळे गाजली. महत्वाचे म्हणजे मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते तर आजही बॉलिवूडमध्ये आणि मीडियामध्ये गाजते. तर कंगना बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्रीसोबतच पंगा क्वीन म्हणून ओळखली जाते. ती नेहमीच विविध गोष्टींवर तिचे स्पष्ट मत मांडताना दिसते. (kangana ranaut shared series of throwback photos said she looked like replica of madhubala)

हे देखील वाचा