कंगना राणावत बॉलिवूडची क्वीन म्हणून तर ओळखली जातेच शिवाय कंगना तिच्या बेधडक बोलण्यामुळे देखील तितकीच प्रसिद्ध आहे. कंगना नेहमीच प्रत्येक मुद्यावर कोणालाही न घाबरता तिचे ठाम मत व्यक्त करते. तिच्या या स्वभावासाठी कधी तिचे कौतुक होते तरी कधी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. वाद आणि कंगना यांचे खूपच जवळचे नाते आहे. मागील काही काळापासून कंगना खूप चर्चेत आहे. सुशांतसिंगच्या मृत्यूनं तर नेपोटिसम वर बोलल्यामुळे असो किंवा आताच्याच शेतकरी आंदोलनावर तिचे मत असो, कंगनाचे ट्विट किंवा तिचे मत या ना त्या कारणाने चर्चेत येणारच.
नुकतंच कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा बिकिनी घातलेला एक पाठमोरा फोटो शेयर केला. झालं, ट्रोलर्सला खाद्य मिळाले. कंगनाने फक्त फोटो शेयर करायचा अवकाश होता. लगेच ट्रोलर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली. कंगनाचा हा फोटो तिच्या फॅन्सला खूप आवडला त्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया आणि लाइक्सचा पाऊस पडला आहे. मात्र असं असलं तरीही अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला.
कंगनाने तिचा रेड आणि ब्लॅक बिकिनी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेयर केला आणि लिहले, “सुप्रभात मित्रांनो, मी मला सर्वात जास्त आवडणाऱ्या ठिकाणी म्हणजे मेक्सिको मध्ये आली आहे. जगातील सुंदर आणि अनपेक्षित ठिकाण म्हणजे मेक्सिको. याच देशातील तुलम या बेटावर सध्या मी आहे.”
कंगनाचा हा फोटो पाहून लगेच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. काही जणांनी कमेंट करत म्हटले की, ‘बघा, साडीतून बिकिनीत आली, मोदीजी काय म्हणतील? ही आपली संस्कृती नाही.’ दुसऱ्याने लिहले की, ‘कपडे कुठे गेले तुझे.’, अजून एकाने कंगनाची बाजू घेत लिहले आहे की, ‘लोकांना काय समस्या आहे? ती एका सेलिब्रिटी आहे, ती तिला जे पाहिजे ते घालू शकते, बीचवर अजून काय घालावे असे तुम्हाला वाटते?
कंगनाने तिच्या या ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तिने ट्विट केले आहे, ‘काही लोक माझ्या बिकिनी फोटोवर जोरदार टीका करत असून अश्लील कमेंट करत आहे, मात्र मी त्यांना विचारू इच्छिते की, जर देवी भैरवी आपले केस मोकळे सोडून, वस्त्रहीन आणि रक्त ग्रहण करणाऱ्या प्रतिमेसह तुमच्या समोर आली तर तुम्ही काय कराल? तुम्ही स्वत:ला भक्त म्हणता? धर्माचं अनुकरण कर. जय श्री राम” असे ट्विट करुन तिनं ट्रोलर्सला चोख उत्तर दिले आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1341700974751051777?s=20