Friday, November 22, 2024
Home अन्य Lock Upp | कंगनाच्या शोला मिळाला पहिला फायनलिस्ट, बघतच राहिले इतर कैदी!

Lock Upp | कंगनाच्या शोला मिळाला पहिला फायनलिस्ट, बघतच राहिले इतर कैदी!

कंगना रणौतचा (Kangana Ranaut) प्रसिद्ध शो ‘लॉक अप’मध्ये फायनलची चढाओढ सुरू झाली आहे. तुरुंगातील कैदी तिकीट-टू-फायनल मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्याच दरम्यान शोला पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. होय, आता ‘लॉक अप’चे उलटे दिवस सुरू झाले आहेत, याचा अर्थ शो हळूहळू शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे.

शिवम आणि अंजलीमध्ये रंगली स्पर्धा
कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ शोने ओटीटीच्या दुनियेत धमाल करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) ते पायल रोहतगी (Payal Rohtagi) यांसारख्या स्पर्धकांनी शोमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली. हळुहळू ‘लॉकअप’ फायनल राउंडमध्ये पोहोचत आहे. विशेष म्हणजे ‘लॉकअप’ला पहिला फायनलिस्टही मिळाला आहे. शोमध्ये तिकीट टू फिनालेसाठी एक टास्क होता, ज्यामध्ये अंजली अरोरा (Anjali Arora) आणि शिवम शर्मा (Shivam Sharma) यांना एकमेकांशी स्पर्धा करायची होती. (kangana ranaut show lock upp got its first finalist as shivam sharma)

शिवम ठरला विजेता
‘लॉकअप’मध्ये अंजली अरोराचा पराभव करत शिवम शर्माने फायनल राउंडचे तिकीट मिळवले. पायल रोहतगी तिकीट टू फिनालेच्या पहिल्या राउंडमध्ये बाहेर पडली, तर पूनम पांडेला (Poonam Panday) दुसऱ्या राउंडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या राउंडमध्ये शिवम शर्मा आणि अंजली अरोरा यांच्यात टास्क झाले.

अंजलीने केली मुनव्वरची फसवणूक
टास्कच्या तिसऱ्या राउंडमध्ये, शिवम शर्माने अंजली अरोरा आणि अली मर्चंट यांना पराभूत करण्यासाठी अवघ्या दोन सेकंदांचा अवधी घेतला आणि फिनालेचे तिकीट जिंकले. अशा परिस्थितीत, ‘स्प्लिट्सविला’चा माजी स्पर्धक कंगना रणौतच्या शोचा पहिला फायनलिस्ट ठरला. तिकिट टू फिनाले टास्कसाठी अंजली अरोरा आणि सायशा शिंदे (Saisha Shinde) यांनी मुनव्वर फारुकीची फसवणूक केली होती. सायशासोबत मिळून अंजली अरोराने मुनव्वर फारुकीला बाहेर करण्यासाठी कट रचला होता, मात्र त्यानंतरही त्यांना या टास्कमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा