Wednesday, March 27, 2024

Lock Upp | शोमध्ये नोरा फतेहीवरून भडकला प्रिन्स नरुला; म्हणाला, ‘मी विवाहित आहे…’

सध्या अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) लॉकअप कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कार्यक्रमात अनेक वाद आणि चर्चा होताना दिसत आहेत त्यामुळे कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. मंदाना करीमीने (Mandana Karimi) नुकताच कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ला निरोप दिला. शोमध्ये आत्तापर्यंत अनेक वाइल्ड कार्ड एंट्री झाल्या आहेत. या कार्यक्रमाला अनेक आठवडे उलटून गेले असले, तरी वाइल्ड कार्ड्सची एन्ट्री अजूनही थांबलेली नाही. आता कार्यक्रमामध्ये आणखी एक वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे आणि तो दुसरा कोणी नसून रियॅलिटीचा लोकप्रिय अभिनेता प्रिन्स नरुला (Prince Narula) आहे. प्रिन्स नरुलाने कंगना रणौतच्या कार्यक्रमात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून प्रवेश केला आणि त्याने येताच अजमा फल्लाहशी (Azama Fallah) वाद घातला आहे.

अजमा फल्लाहने रविवारी लॉक-अपमध्ये प्रवेश करणार्‍या प्रिन्स नरुलासोबत माजी प्रेयसी, नृत्यांगना आणि अभिनेत्री नोरा फतेहीबद्दल (Nora Fatehi) बोलताना त्याची खिल्ली उडवली. मात्र त्याची ही चेष्टा काही प्रिन्सला आवडली नाही. नोराचे नाव ऐकून प्रिन्स नरुला चिडला. यामुळे तो अजमावर चांगलाच संतापला आणि पुन्हा असे करू नकोस, अशी धमकीही दिली. ‘लॉकअप’च्या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये अजमा फल्लाह आणि प्रिन्स नरुला यांच्यातील हा वाद पाहता येईल. ‘बिग बॉस सीझन ९’ मध्ये एकत्र असताना अजमा फल्लाह प्रिन्स नरुला आणि नोरा फतेही यांच्याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.

दरम्यान प्रिन्स नरुलाने युविका चौधरीसोबत (Yuvika Chaudhary) लग्न केले आहे. ‘बिग बॉस सीझन ९’ (२०१६) मध्येही प्रिन्स युविकाला भेटला होता. त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले. यापूर्वी प्रिन्स नरुलाने सांगितले होते की, तो नोरा फतेहीला डेट करत आहे. त्याच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र सध्या तो कंगनाच्या लॉकअपमध्ये धमाल करताना दिसत आहे. ज्याचा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा