कंगना नेहमीच तिच्या बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती आजूबाजूच्या परिस्थितीवर किंवा कोणत्याही व्यक्तीवर थेट मत मांडते. रस्ताही ती अजिबात मागेपुढे पाहत नाही. नुकतेच कंगनाने तरुण वर्गावर तिचा निशाणा साधत विवादित विधान केले आहे. कंगनाने त्याला लोकांना टार्गेट केले ज्यांचा जन्म १९९७ ते २०१२ च्या कालावधीत झाला आहे. अशा जन्म झालेल्या मुलांना GenZ म्हटले जाते. कंगनाने याच GenZ लोकांची आलोचना केली असून, सोशल मीडियावर एक पोस्ट देखील लिहिली आहे. या विभागात येणाऱ्या लोकांना तिने आळशी देखील म्हटले आहे.
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये लिहिले, “GenZ हा हा त्यांचे पाय आणि पाठ काठी सारखे आहेत. ते त्यांचा जास्तवेळ बोलण्यात, पाहण्यात किंवा अभ्यास करण्यापेक्षा मोबाइलवर घालवतात. ते शब्द पाळण्यात अयशस्वी आहेत आणि त्यांची इच्छा असते की त्यांना बॉसचे पद दिले जावे. या पदाचे ते अजिबात सन्मान करत नाही. कारण त्यांचे बॉस शिस्तीवर विश्वास ठेवतात आणि अथक परिश्रम घेतात. आणि GenZ फक्त कमी वेळात यशस्वी होण्यावर विश्वास ठेवतात.”
पुढे कंगनाने लिहिले, “GenZ ला स्टारबक्स आणि अवोकाडो टोस्ट खूप आवडतात. मात्र ते घर खरेदी करण्याची जबाबदारी नाही उचलू शकत. ते कोणाला इम्प्रेस करण्यासाठी ब्रँडेड कपडे भाड्याने घेऊ शकतात, मात्र कमिटमेंट करण्यापासून किंवा लग्न करण्यापासून स्वतःला वाचवतात. शोधात हे देखील जाणवले की ते शारीरिक संबंध ठेवण्यात देखील आळशी आहे. GenZ खरे तर गाजर, मुळ्याप्रमाणे आहे. त्यांच्यासाठी मूर्खपणाच्या गोष्टी ब्रेन वॉश आहे.”
आता कंगनाच्या या मताचे काय पडसाद उमटतात ते पाहावे लागेल. तत्पूर्वी सध्या कंगना चंद्रमुखी २ चे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. हा तामिळ हॉरर सिनेमा चंद्रमुखीचा पुढचा भाग आहे. पहिल्या भागात रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत होतो तर दुसऱ्या भागात कंगना राजाच्या दरबारातील डान्सरच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमात ती तामिळ अभिनेता राघव लॉरेंससोबत दिसणार आहे. याशिवाय तिने तिच्या ‘इमरजेंसी’ सिनेमाची शूटिंग पूर्ण केली असून , हा सिनेमा इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. सोबतच तिचा ‘तेजस’ हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकीकडे संपत्तीचे वाद सुरु असताना दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
ऑस्कर सोहळ्यामध्ये दीपिका पदुकोण दाखवणार तिचा जलवा, दिसणार ‘या’ भूमिकेत