कंगना रणौत आणि करण जोहर यांच्यात वाद होणे काही नवीन नाही. कंगना अनेकदा आपल्या ट्वीटद्वारे करणवर निशाणा साधताना दिसते. यावेळी, तिने नाव न घेता दिग्दर्शक आणि त्याच्या टीव्ही शोवर टीका केली आहे. यासह कंगनाने सिमी ग्रेवालच्या शोचे कौतुक केले आहे.
वास्तविक, एका युजरने सिमी गरेवालला टॅग करून एक ट्वीट लिहिले की, “मी सध्या सिमी गरेवालला पाहत आहे. मला असे वाटत नाही की कोणताही मुलाखत घेणारा त्यांच्यासारखा वारसा सांभाळू शकेल. आजकालच्या कार्यक्रमांमध्ये प्रामाणिकपणा दिसत नाही.” युजरच्या या ट्विटवर कंगनानेही प्रतिसाद दिला आहे.
I am watching it right now ! @Simi_Garewal is phenomenal. I don’t think any interviewer can match her level of grace. These shows nowadays have no soul honestly. Hers was authentic and enjoyable. Try watching the one with Benazir Bhutto ! @Simi_Garewal you are ???? ???? ???? ????????
— Zarghoona Wajid, M.D. (@ZarghoonaWajid) March 26, 2021
कंगनाने लिहले की, “हो, सिमी गरेवाल यांनी एका सेलिब्रिटीचा खरा लूक सादर केला, विषयाचा संपूर्ण स्केच. जया माँ यांच्या शोने माझ्या संशोधनात मला खूप मदत केली. अशीच गोष्ट बाप बनत फिरणाऱ्या लोकांच्या मुलाखतींमध्ये होऊ शकत नाही, जे एकमेकांच्या वाईट, चुगल्या, गप्पाटप्पा आणि निराश लैंगिकतेबद्दल बोलत असतात.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1376723200982179841
सिमी गरेवालने 1997 मध्ये आपल्या शोची सुरुवात केली होती. शोचे पाच सिझन प्रसारित झाले आहेत. तिने आतापर्यंत अमिताभ बच्चन, शाहरुख, ऋषी कपूर, करीना कपूर, रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह शेकडो लोकांची मुलाखत घेतली आहे.
करण जोहरच्या शो कॉफी विथ करणविषयी बोलायचे झाले, तर हा शो 2004 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला होता. याचे आतापर्यंत सहा सिझन प्रसारित झाले आहेत. करण जोहरच्या शोमध्ये कंगना रणौतही आली होती. विशाल भारद्वाजच्या रंगून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी, ती शोमध्ये दिसली होती. त्या एपिसोडमध्ये कंगनाने करण जोहरला ‘घराणेशाहीला समर्थन देणारा’ आणि ‘मूव्ही माफिया’ म्हणून देखील संबोधले होते. त्यानंतर कंगना आणि करण कित्येक प्रसंगी एकमेकांवर लक्ष्य साधताना दिसले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिलजीतने शेअर केला मुलासोबतचा मजेशीर व्हिडिओ, सेलेब्सनी विचारले ‘आई कुठे आहे?’
-मराठमोळी जोडी रितेश अन् जेनेलियाही रंगले होळीच्या रंगात, रोमँटिक व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!!
-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा