Wednesday, July 3, 2024

कंगना रणौतला मिळाला तिच्या आयुष्याचा जोडीदार? म्हणाली, ‘लवकरच…’

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील पंगा गर्ल अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे कंगना रानौत. कंगना नेहमीच तिच्या फटकळ आणि स्पष्टवक्ता स्वभावासाठी ओळखली जाते. ती सर्वच प्रश्नांची अतिशय बिनधास्त आणि सडेतोड उत्तरं देते. नुकताच कंगनाला मानाच्या समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारानंतर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत सर्वांचे आभार देखील मानले. कंगनाने नुकतेच एका मुलाखतीमध्ये ती पुढच्या पाच वर्षात स्वतःला कुठे बघते याबद्दल तिचे विचार व्यक्त केले.

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाची बहार आली आहे. अनेक लोकप्रिय जोड्या आणि मोठे कलाकार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे कंगनाला एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाविषयीची प्लॅनबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने दिलेले उत्तर अनेक प्रश्न निर्माण करत आहे. यावेळी तिला विचारले गेले की, आगामी पाच वर्षात ती स्वतःला कुठे बघते? यावर तिने सांगितले की, ती आगामी पाच वर्षात स्वतःला विवाहित स्त्री म्हणून बघते. शिवाय याच पाचवर्षांमध्ये ती स्वतःला एक आई म्हणून देखील बघत आहे. यावेळी तिने तिच्या जोडीदाराबद्दल एक अपेक्षा देखील बोलून दाखवली ती म्हणाली की, तिला अशी व्यक्ती जोडीदार म्हणून पाहिजे जिचे विचार नव्या भारताबद्दल जरा वेगळे असतील.

पुढे तिला तिच्या जोडीदाराबद्दल विचारले गेले की, तिचा जोडीदार कोण आहे? यावर तिने सांगितले की, “लवकरच समजेल. आता मी माझ्या आयुष्याच्या आनंदी आणि सुखी वळणावर आहे.” कंगनाची वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा काही दिवसांपूर्वीच ‘थालायवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा चित्रपट माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित होता. ती आगामी काळात आपल्याला ‘मणिकर्णिका रिटर्न्स’, ‘द लीजेंड ऑफ डिड्डा’, ‘इमरजेंसी’, ‘धाकड़’, ‘तेजस’, ‘द इन्कर्नेश: सीता’ आदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये

कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा