Monday, July 1, 2024

भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ अशी जिची ओळख आहे ती म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत होय. तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिने अनेकवेळा इतर कलाकरांबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. एवढंच नाही, तर राजकारणाबाबत देखील तिने अनेकदा तिचे मत व्यक्त केले आहे. यामुळे अनेकवेळा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे ट्वीटर अकाउंट निलंबित केले गेले आहे. पण तिच्या व्यावसायिक आयुष्यात मात्र ती एका पेक्षा एक हिट चित्रपट देताना दिसत आहे. तिचा बहुचर्चित चित्रपट म्हणजे ‘थलायवी’. हा चित्रपट अभिनेत्री तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. अशातच कंगनाने या चित्रपटाबाबत एक मोठी आणि आनंदाची बातमी सांगितली आहे.

अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या चित्रपटानंतर कंगनाचा ‘थलायवी’ हा दुसरा चित्रपट असणार आहे, जो चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. या पोस्टवर ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण देशात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, असे सांगितले आहे. याआधी अशी माहिती आली होती की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट आधी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि नंतर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाणार आहे. (kangana ranaut thalaivi movie will release in theaters)

कंगना रणौत नुकतेच तिच्या ‘धाकड’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण करून आली आहे. आता तिने तिच्या ‘तेजस’ या चित्रपटाची शूटिंग चालू केली आहे. कंगनाने इंस्टाग्रामवर एअरफोर्स ऑफिसरची वर्दी घालून एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, तिने ‘तेजस’ या चित्रपटाची शूटिंग चालू केली आहे. तिने लिहिले होते की, “माझे पुढचे मिशन ‘तेजस’ आजपासून सुरू होत आहे. पूर्ण जोशाने सुरुवात, यासाठी संपूर्ण टीमचे धन्यवाद.” ‘तेजस’ या चित्रपटात ती भारतीय वायुसेनेच्या पायलटचा रोल निभावत आहे. तसेच ती इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित ‘इमरजेंसी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील करणार आहे. शिवाय ती ‘मणिकर्णिका रिटर्न्स : द लिजेंड ऑफ दिद्दा’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा