देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज (17, सप्टेंबर) मोठ्या जल्लोशात पार पडताना दिसत आहे. देशभरातील विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरुन अनेकांनी नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतच्या शुभेच्छांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रत्येकजण पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीही पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने (Kangana Ranaut) पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने पीएम मोदींसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती त्यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. कंगनाने पीएम मोदींना या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हटले आहे. कंगनाची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. फोटो शेअर करत कंगणाने “हॅपी बर्थडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी’. लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या ग्रहावरील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास किती अविश्वसनीय आहे. आम्ही तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देते. रामाप्रमाणे, कृष्णासारखे, गांधीसारखे, तुम्ही अमर आहात. तुमचा वारसा कोणीही पुसू शकत नाही, म्हणूनच मी तुम्हाला अवतार म्हणते, तुम्ही आमचे नेते आहात याचा आनंद आहे,”अशा शब्दात त्यांचे कौतुक केले आहे. कंगणाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
दरम्यान अभिनेत्री कंगणा रणौत तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटामुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील तिच्या लूकने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
हेही वाचा – ‘या’ चित्रपटामुळे मित्राचा मार खाणार होता शरद केळकर, वाचा अभिनेत्याचा किस्सा
आईच्या हट्टाने सनाया ईरानी झाली अभिनेत्री, पुढे मोहित सेहगलसोबत थाटला संसार
घटस्फोटानंतर हनी सिंगने केली नवीन अल्बमची घोषणा, वाईट काळानंतर दणक्यात करणार कमबॅक