Friday, July 5, 2024

मोठी बातमी! कंगना रणौतच्या बॉडीगार्डवर बलात्काराचा गुन्हा दाखल; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषणाचा आरोप

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडे याच्या विरोधात बलात्काराच्या प्रकारणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुंबईमधील डीएन नगर येथील पोलीस स्टेशनमध्ये एका ब्युटीशिअनने केलेल्या तक्रारीनंतर हेगडेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, 30 वर्षीय महिला ब्युटीशियनने कुमार हेगडेवर आरोप केला आहे की, त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा बलात्कार केला आहे.

एफआयआरनुसार, मागच्या वर्षी जूनमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान ती ब्युटीशिअन हेगडेला भेटली होती. पोलिसांनी आरोपीवर भारतीय कायद्यानुसार त्याच्यावर 376, 377, 420 हे कलम लावले गेले आहे.

तक्रारीत महिलेने सांगितले की, तिने शारीरिक संबंधासाठी नकार दिला पण त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. या सोबतच तिने सांगितले की, हेगडेने तिच्याकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्याने सांगितले होते की, त्याची आई आजारी आहे. तेव्हापासून त्याने तिच्याशी कोणताच संपर्क ठेवला नाही.

ब्युटीशिअनने सांगितले की, ती आठ वर्षांपूर्वी ती हेगडेसोबत संपर्कात आली होती. मागच्या वर्षी जूनमध्ये त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली. त्यांनतर हेगडेने बलात्कार केला. कंगनाच्या टीमला संपर्क करण्याचा देखील प्रयत्न केला पण तिने केवळ एवढेच सांगितलं की, तो खूप दिवसांपासून सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे तिला जास्त काही माहिती नाहीये.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिचा थलायवी हा चित्रपट 23 एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याला खूप लाईक्स मिळाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कंगनाचे ट्विटर अकाऊंट निलंबित केले आहे. यांनतर देखील ती अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर

-क्या बात है! मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; दिवाळीच्या आसपास होणार रिलीझ

हे देखील वाचा