Sunday, May 19, 2024

भयंकर! ‘या’ कन्नड अभिनेत्याने जोडप्याच्या अंगावर घातली भरधाव कार; महिलेचा मृत्यू

अलीकडच्या काळात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. नुकतीच मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागभूषण याच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर पुरुष जखमी झाला. त्यामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागभूषण शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्याच्या कारने बेंगळुरूच्या एमजी रोडवरून प्रवास करत होता. त्यावेळी, रस्त्याच्या कडेला पायी चालत असलेल्या एका जोडप्याला त्याच्या कारने धडक दिली. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पुरुष गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागभूषण (Nagbhushan ) याच्या कार अपघात हा कन्नड सिनेसृष्टीसाठी एक मोठा धक्का आहे. नागभूषण हा एक लोकप्रिय अभिनेता आहेत आणि त्यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. त्याचा हा अपघात कसा झाला आहे याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. नागभूषण यांने या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

पोलिस तक्रारीत अपघाताचे कारण अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे असल्याचे म्हटले आहे. ही घटना शनिवारी रात्री 9.45च्या सुमारास घडली. बेंगळुरूच्या वसंत पुरा मेन रोडवर फूटपाथवरून चालत असलेल्या जोडप्याला नागभूसमने धडक दिल्याचे बोलले जात आहे. ते उत्तरहल्लीहून कोननकुंटेकडे जात होते. या अपघातात 48 वर्षीय प्रेमा या महिलेचा रुग्णालयात नेत असतानाच मृत्यू झाला. त्याचवेळी प्रेमाचा पती कृष्णा (58 वर्षे) याच्या दोन्ही पायांना, डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली.

अभिनेता नागभूषण विषयी बोलायचं झाले तर, नागभूषण शेवट तगारुपाल्य या चित्रपटात झळकला होता. त्याने 2018 मध्ये संकट कारा गणपती मधून पदार्पण केले आहे. त्याने कौसल्या सुप्रजा रामा, डेअरडेव्हिल मुस्तफा, बडावा रास्कल, इक्कत, मेड इन चायना आणि इतर सारख्या इतर चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Kannada actor Nagbhushan has given the couple the death of a woman hit by a car)

आधिक वाचा-
…म्हणून लग्नाआधीच लिव्हइनमध्ये राहत होते सुव्रत आणि सखी, अभिनेता म्हणाला; ‘प्रेम केलयं तर काय हरकत आहे’
समर्पण लामा ठरला ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3’चा विजेता, ट्रॉफीसह मिळाली ‘एवढी’ रोख रक्कम

हे देखील वाचा