मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सुव्रत जोशी यांनी सखी गोखले हे एक लोकप्रिय कपल आहे. या दोघांनीही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमध्ये काम केले होते त्यांच्यातील मैत्रीचे सगळ्यांनाच अंदाज होता परंतु एक 11 एप्रिल 2019 रोजी या जोडप्याने लग्न बांधली आणि सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. त्यानंतर हे जोडपे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात.
सोशल मीडियावर देखील ही जोडी खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच जोडप्याने माध्यमांना मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. खास करून त्यांच्या नात्याबद्दल देखील त्यांनी सांगितले आहे. लग्नापूर्वी सुव्रत आणि सखी हे लिविंग रिलेशनमध्ये राहत होते. परंतु त्यांना हा निर्णय काय घ्यायला लागला या मागचं कारण देखील त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
यावेळी या जोडप्याने सांगितले की, “साखरपुड्यानंतर आम्ही लिविंग रिलेशनमध्ये राहत होतो कारण हे खूप महत्त्वाचे आहे या विषयावर परेश मोकशी यांची एक फिल्म सुद्धा आली आहे. आपण बाजारातून कोणतीही वस्तू विकत घेताना ती पारखून बघतो किती चांगली आहे की नाही मग लग्न हा एवढा मोठा निर्णय आपण एकत्र न राहता कसा काय घेणार? आता लोकांना वाटेल की फार कॉंट्रोव्हर्शिल बोलतोय पण मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की काय हरकत आहे?”
पुढे सुव्रत म्हणाला की, “काही वेळा काय होतं तुमचे एखाद्यावर प्रेम असतं पण त्या व्यक्तीसोबत सहवास नाही घडत. त्यामुळे लोक असे म्हणतात की,लवमॅरेज टिकत नाही त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की, तुमचा एकमेकांना प्रेम असतं. पण एकत्र राहण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं तुम्हाला सहवास आणि तो सहवास करताना अनेक पद्धतीने स्वतःच्या सवयी बदलाव्या लागतात आणि त्या आनंदाने बदलावे लागतात. त्यामुळे लिव्हइनमध्ये राहणे खूप आवश्यक असतं.”
अशाप्रकारे त्यांनी त्यांच्या नात्याची झालेली सुधारणा लिव्हइननंतर त्यांच्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत काम करतात आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
रवीना टंडनने मुलीला सांगितले तिच्या सगळ्या अफेअर्सचे सत्य, म्हणाली; ‘तिला आज ना उद्या समजणारच आहे.’
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेतून दिलीप जोशी का घेणार मोठा ब्रेक? जाणून घ्या खरे कारण