साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेता संपत जे. राम याने आत्म’हत्या केली आहे. अभिनेता केवळ 35 वर्षांचे होता आणि आर्थिक तंगीशी झुंजत होता. अभिनेत्याच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
संपत जे. राम (sampath j ram) हा कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्टार होता. त्यांनी शनिवारी (22 एप्रिल)ला नेलमंगळा येथील राहत्या घरी आत्म’हत्या केली. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनावर कन्नड कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
संपतने ‘अग्निसाक्षी’सारख्या सुपरहिट मालिकांमध्ये काम केले. याशिवाय ‘श्री बालाजी फोटो स्टुडिओ’ या चित्रपटातही या अभिनेत्याने आपले अभिनय कौशल्य दाखवले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे समीक्षकांनीही कौतुक केले. चित्रपट दिग्दर्शक राजेश ध्रुव यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक दीर्घ पोस्ट लिहून अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. याशिवाय अभिनेत्याच्या चाहत्यांनाही या बातमीने धक्का बसला आहे.
माध्यमातील वृत्तांनुसार, कन्नड अभिनेता संपतचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. अपेक्षेप्रमाणे चित्रपट आणि टीव्ही शोच्या ऑफर न मिळाल्याने संपत नैराश्यात होता, त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे त्याला एवढे कठोर पाऊल उचलावे लागले. अभिनेत्याचे अंतिम संस्कार आज केले जाण्याची शक्यता आहे.(kannada actor sampath j ram dies by suicide facing financial crisis )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करण जोहरच्या विश्वासामुळे राणी मुखर्जी बनली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री, आवाजाने दिली नवी ओळख
संजीव कुमार आयुष्यभर अविवाहित असण्याचे कारण होते विचित्र, महिलांबद्दल करायचे ‘असा’ विचार