Saturday, September 30, 2023

Birth Anniversary: संजीव कुमार आयुष्यभर अविवाहित असण्याचे कारण होते विचित्र, महिलांबद्दल करायचे ‘असा’ विचार

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले, ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. यातच नाव येते ते म्हणजे, अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांचं. आपल्या बेजोड अभिनयाच्या आणि आकर्षक चेहऱ्याच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारे अभिनेते संजीव कुमार यांना कोण ओळखत नाही! संजीव कुमार यांनी केवळ गंभीरच नव्हे, तर अनेक विनोदी भूमिकाही चोख साकारल्या, ज्यासाठी आजही त्यांची आठवण काढली जाते. संजीव कुमार त्यांच्या कारकिर्दीत खूप यशस्वी होते, पण ते आयुष्य एकटेच राहिले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, त्यांच्या आयुष्यात एकही स्त्री आली नाही. इतकेच नाही, तर संजीव कुमार यांना असे वाटायचे की, स्त्रियांना त्यांच्यावर नव्हे तर पैशावर प्रेम आहे.

संजीव कुमार यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरीवाला होते. जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले, तेव्हा आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला. संजीव कुमार यांचे व्यक्तिमत्व इतके सशक्त होते की, महिला आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होत असत. असे असूनही ते आयुष्यभर एकटेच राहिले. दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अभिनेत्री अंजू महेंद्रू (Anju Mahendru) म्हणाल्या की, “संजीव कुमार हे महिलांनी वेढलेले असायचे. अनेकांनी त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, ते अनेकांच्या प्रेमातही पडले. परंतु जेव्हा ते एखाद्या महिलेच्या जवळ जायचे, तेव्हा तिच्याशी संबंधित लोक त्यांना सांगायचे की, तिला पैशात रस आहे.

अंजू महेंद्रू म्हणाल्या होत्या, “जेव्हाही संजीव कुमारचे नाव एखाद्या महिलेशी जोडले जायचे, तेव्हा त्यांच्या जवळचे लोक त्यांना ‘अरे यार तेरे पैसे के पीछे है’ असे सांगून भडकावायचे. मी त्यांना समजावले ‘हरी, तू वेडा आहेस का?? तू स्वतःला समजू शकत नाहीस? ‘अशा प्रकारे तू कधीच लग्न करणार नाहीस. ती तुझ्या पैशाच्या मागे लागली तरी काय? तू कधीच लग्न करू शकणार नाहीस.’ काही स्त्रिया त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होत्या. पण त्यांच्या मनात एकच गोष्ट होती की, ती त्यांच्या पैशाच्या मागे लागली आहे. शेवटच्या दिवसात त्यांच्याकडे ना घर होते ना पत्नी.”

संजीव कुमार यांचे वयाच्या 47व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘खिलोना’, ‘सीता और गीता’, ‘अनामिका’, ‘आप की कसम’, ‘आंधी’ आणि ‘शोले’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.(sanjeev kumar not marry in his whole life he always thought that women were after his money)

अधिक वाचा- 
साडीचा नखरा…अभिनेत्री आर्या आंबेकरचा पारंपरिक साज
“आपल्या देशातील नेते अशिक्षित, त्यांच्याकडे…”, बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं मोठ भाष्य

हे देखील वाचा