काही दिवसांपूर्वीच कन्नड सिनेजगतातील एका आघाडीच्या अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. ही बातमी ताजी असतानाच आणखी एका लोकप्रिय कन्नड अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय कन्नड अभिनेता सतिश वज्रचा (Satish Vajra) मृत्यू झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे ज्यामुळे संपुर्ण सिने जगतात खळबळ माजली आहे. सतिशच्या निधनानंतर अनेक कन्नड अभिनेते हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, प्रसिद्ध कन्नड अभिनेता सतीश वज्रचे निधन झाले आहे. पोलिसांना त्याचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात सापडला आहे. सतीश बंगळुरू येथे राहत होता, कोणीतरी त्याचा खून केल्याचही माहिती समोर आली आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीचाही मृत्यू झाला होता, रिपोर्ट्सनुसार त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती. सतीशच्या मृत्यूने इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे, सतीशची हत्या इतर कोणी नसून त्याच्या पत्नीच्या भावाने म्हणजेच त्याच्या मेहुण्याने केल्याचा पोलिसांना संशय आहे.
वृत्तानुसार, जेव्हा सतीश वज्राच्या जागा मालकाने फ्लॅटमधून रक्त येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी फ्लॅट उघडला तेव्हा सतीशचा मृतदेह जमिनीवर रक्ताने माखलेला आढळून आला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
सतीश वज्रने आपल्याच नात्यातील एका मुलीशी लग्न केले होते, त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या लग्नावर खूश नव्हते, या लग्नावरून दोन्ही कुटुंबात अनेकदा भांडणे झाली होती. यामुळे तीन महिन्यांपूर्वी पत्नीने आत्महत्या केली होती, आता सतीशच्या मृत्यूने लोकांना धक्का बसला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भल्याभल्यांना गार करणाऱ्या राखीचा जॉनी लिव्हरच्या मुलीलाही दणका, ‘हे’ काम करताना सापडली रंगेहात
अरे हे काय! आलियाला सोडून ‘या’ अभिनेत्रीपुढे गुडघे टेकताना दिसला रणबीर, पाहा Viral Video