बुरखा घालून डान्स केल्यानंतर ट्रोल झाली मंदाना, नेटकऱ्यांना दिले असे प्रत्युत्तर म्हणाली ‘लोक वेडे झालेत पण..’

बॉलिवूड अभिनेत्री मंदाना करीमी (Mandana Karimi) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे, तर कधी स्पष्ट विधानांमुळे ती नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते. अलीकडेच अभिनेत्री मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मंदाना करीमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बुरखा घालून नाचताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओमुळे मंदानालाही ट्रोलचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी, आता अभिनेत्रीने एक गोष्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये तिने ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुणावले आहेत.काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

मंदाना करीमीही सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. ज्यावरुन ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिच्या अशाच एका पोस्टमुळे तिला नेटकऱ्यांचा रोश पत्करावा लागला आहे. मंदाना करीमीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एका दुकानात बुरखा घालून नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमुळेच मंदानाला नेटकऱ्यांनी खडेबोल सुणावले आहेत.

काही जणांनी हिजाबचा अनादर केल्याचे म्हणत आहेत, तर काही वापरकर्ते तिला अनफॉलो करणार असल्याचे बोलत आहेत. एका यूजरने लिहिले की, “तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही मुस्लिम असूनही हिजाबची खिल्ली उडवत आहात, हा व्हिडिओ किती असभ्य आहे हे तुम्हाला कळायला हवे” त्याचवेळी दुसऱ्याने एकाने, “हिजाबचा अनादर करू नका, असा व्हिडिओ बनवण्यापूर्वी एकदा विचार करावा” असे म्हणत जोरदार टिका केली आहे.

https://www.instagram.com/reel/Ce5SP72JDn5/?utm_source=ig_web_copy_link

आता मंदानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्वत:चा फोटो टाकून ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ज्यामध्ये ती म्हणते की “..आणि माझ्या बुरख्याच्या रीलवरील कमेंट्स वाचल्या. लोक वेडे आहेत आणि ही दुनियासुद्धा बस्स,आता मला युनिक व्हायचे आहे,” या मिरर सेल्फीमध्ये मंदाना ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान करताना दिसत आहे.अभिनेत्री मंदाना करीमी शेवटची कंगना रनौतच्या शो ‘लॉकअप’ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Latest Post