Sunday, February 16, 2025
Home अन्य मोठी बातमी : कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांना देवाज्ञा

मोठी बातमी : कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांना देवाज्ञा

कन्नड चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. दिग्दर्शक एसके भगवान यांचे बेंगळुरू येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते आणि वृध्दापकाळात संबंधित आजारांनी त्रस्त होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करून एसके भगवान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, ‘कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसके भगवान यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करतो.’ (kannada-fim-director-sk-bhagavan-passes-away-in-bengaluru)

हे देखील वाचा