Saturday, June 29, 2024

नव्या जाहिरातीमध्ये अतरंगी कपड्यांमध्ये दिसले कपिल देव, नेटकरी म्हणाले रणवीर सिंगचा घेतला आदर्श

प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची नुकतीच एक जाहिरात प्रदर्शित झाली आहे. या जाहिरातीमध्ये कपिल देव खेळपट्टीवर वेगवेगळ्या प्रकारच्या अतरंगी वेशभूषेत दिसत आहे. ही जाहिरात प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या जाहिरातीत कपिल देव अभिनेता रणवीर सिंगकडून प्रेरणा घेत चित्र- विचित्र पेहरावात दिसून येत आहेत. चमकदार गुलाबी रंगाची क्रिकेट जर्सी पासून विचित्र पोषाख त्यांनी परिधान केला आहे. तसेच या विचित्र ड्रेससोबत त्यांनी विचित्र सनग्लासेस देखील घालते आहे. कपिल देव यांच्यात असणाऱ्या रणवीर सिंगला ते या जाहिरातीतून दाखवत आहे. क्रिकेटच्या पिचवर स्कर्ट आणि भडक कलरच्या कपड्यांमध्ये दिसणाऱ्या कपिल देव यांचा हा लूक काहींना आवडला तर काहींनी तयार टीका करत अनेक मीम्स देखील बनवले आहेत.

ज्याप्रकारे रणवीर सिंग त्याच्या खऱ्या आयुष्यात आणि कधी कधी चित्रपटांमध्ये देखील असे कपडे परिधान करतो. आता रणवीरला कपिल देव यांनी या जाहिरातीमध्ये कॉपी केले आहे. तसेच कपिल देव या जाहिरातीमध्ये रणवीर सिंगसारखे विचित्र कपड्यांमध्ये पिचवर दिसत असल्याने ही जाहिरात बघितल्यानंतर फॅन्सने त्यांचे मतं सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. नेटकरी म्हणत आहे की, ज्याप्रकारे रणवीर कपिल देव यांच्या रुपात शोभून दिसत आहे. तसेच कपिल देव देखील रणवीर सिंगप्रमाणे खूप स्टायलिश आणि हटके दिसत आहे.

१९८३ च्या वर्ल्ड कपवर आधारित ‘८३’ हा चित्रपट कबीर खान यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला असून, हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून कपिल देव आणि भारतीय क्रिकेट टीमच्या संघर्षाची आणि विजयाची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कपिल देव यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला क्रिकेटचा वर्ल्डकप मिळवून दिला होता. ८३ मध्ये रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अनेक कलाकार कपिल देव यांच्या विजेत्या सदस्यांच्या भूमिका निभावताना दिसतील. या सिनेमाचे पोस्टर आणि रणवीरचा लूक आधीच प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटात सुनील गावस्कर यांची भूमिका ताहिर राज भसीन, मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकीब सलीम, बलविन्नर संधू यांची भूमिका एम्मी विर्क, सय्यद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर, संदीप पाटील यांची भूमिका चिराग पाटील, दिलीप वेंगसरकर यांची भूमिका आदिनाथ कोठारे, रवी शास्त्री यांची भूमिका धीरज कर्वा, कीर्ती आझाद यांची भूमिका दिनकर शर्मा, जतीन सरना यांची भूमिका यशपाल शर्मा, मदन लाल यांची भूमिका संधू, रॉजर बिन्नी यांची भूमिका निशांत दहिया, सुनील वाल्सन यांची भूमिका आर बद्री आणि प्रशिक्षक पीआर मान सिंग यांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारल्या आहेत. या सिनेमात दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तणावापासून दूर राहण्यासाठी प्रियांका पोहचली माशांच्या जगात, स्पेनमध्ये करतेय स्कूबा डायविंग

-निक जोनास पत्नी प्रियांका चोप्रावर किती प्रेम करतो? लाईव्ह कॉन्सर्टमध्ये व्यक्त केल्या आपल्या भावना

-‘द बिग पिक्चर’ शोदरम्यान रणवीर सिंग झाला भावूक, ‘या’मुळे अभिनेत्याला अनावर झाले अश्रू

हे देखील वाचा