Thursday, April 25, 2024

निक जोनास पत्नी प्रियांका चोप्रावर किती प्रेम करतो? लाईव्ह कॉन्सर्टमध्ये व्यक्त केल्या आपल्या भावना

निक जोनस आणि प्रियांका चोप्रा हे चित्रपटसृष्टीतील रोमँटिक जोडप्यांपैकी एक आहेत. ‘जोनास ब्रदर्स’ या दिवसांमध्ये आपल्या कॉन्सर्टमध्ये व्यस्त आहेत. तिघेही वेगवेगळ्या गाण्यांवर परफॉर्म करताना दिसत आहेत. मात्र, कॉन्सर्टमध्ये निक प्रियांकाचे नाव घेऊन असं काही बोलला की, प्रियांकाचे चाहते खूप आनंदाने उठून उड्या मारायला लागले. निक जोनासचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये निक आपली पत्नी प्रियांका चोप्राला ‘परफेक्ट जीवन साथीदार’ बोलताना दिसत आहे. यावेळेस निकचा भाऊ जो जोनासने देखील यावर रिऍक्ट केले आहे.

हा व्हिडिओ एका फॅन पेजवर देखील शेअर करण्यात आला आहे. या कॉन्सर्टमध्ये निक जोनास म्हणाला की, “माझे लग्न करण्याचा निर्णय खूप चांगला होता. मी खूप नशीबवान आहे की, मला एक परफेक्ट जीवन साथीदार मिळाली आहे.” या दरम्यान निक जोनासचे भाऊ हातामध्ये पेय घेऊन उभे होते. निकच्या या गोष्टीवर निकच्या भावाने सहमती दर्शवली.

निक आणि प्रियांका या जोडीला खूप पसंत केले जाते. त्यांनी २०१८ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चनच्या रीतीरिवाजाने लग्न केले होते. लग्नाच्या आधी टिळा आणि लग्नानंतर रिसेप्शन त्यांनी मुंबईमध्ये केले होते. याआधी ते दोघे एकमेकांना डेट करत होते. जास्त वेळ न घालवता त्यांनी लग्न केले. निक आणि प्रियांकाने भारतामध्येच लग्न केले होते.

एका मुलाखतीत प्रियांकाने सांगितले होते की, “लग्नानंतर माझ्यामध्ये खूप बदल झाले आहेत. यापूर्वी मला खूप राग येत होता, आता तसे नाहीये. मी निकमुळे शांततेत काम करायला शिकले आहे.”

काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा व्हिक्टोरिया सीक्रेटच्या व्हीएस व्हॉईस पॉडकास्टमध्ये निकबद्दल बोलली. तिने सांगितले की, “आता आयुष्यात काही मोठे करण्याआधी निक जोनास मला पूजा करण्यास सांगतो. जरी निक आणि मी दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असलो, तरीही आध्यात्मिकदृष्ट्या दोघेही समान आहोत.”

या पॉडकास्टमध्ये प्रियांका चोप्रानेही निकचे खूप कौतुक केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सनी आणि बॉबी या सावत्र मुलांसोबत कसे आहे हेमा मालिनी यांचे नाते, स्वतः ड्रीमगर्लनेच केला होता खुलासा

-अखेर प्रतीक्षा संपली! अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित सूर्यवंशी ‘या’ दिवशी चित्रपटगृहांमध्ये करणार धमाका

-नुसरत जहाँ अन् यश दासगुप्ताने गुपचूप उरकलंय लग्न? पुन्हा दिली अभिनेत्रीने ‘हिंट’

हे देखील वाचा