Sunday, February 23, 2025
Home अन्य कपिल शर्मा कॉमेडीनंतर आता ‘या’ इंडस्ट्रीमध्ये करणार पदार्पण, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

कपिल शर्मा कॉमेडीनंतर आता ‘या’ इंडस्ट्रीमध्ये करणार पदार्पण, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या कॉमेडीसोबतच उत्तम गाण्यासाठी देखील ओळखला जातो. कपिल अनेकदा बोलला आहे की, त्याला गायक व्हायचे होते. मात्र नशिबाने त्याला विनोदाच्या इंडस्ट्रीमध्ये आणले. मात्र आता कपिल शर्माला त्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी मिळाली आहे. लवकरच कपिल गायक गुरु रंधावासोबत एका गाण्याच्या अल्बममध्ये दिसणार आहे. या अल्बमचे नाव असेल ‘अलोन’. गुरु रांधवा हे पंजाबी इंडस्ट्रीमधील मोठे नाव असून, गुरु आणि कपिल सोबत येणार म्हटल्यावर धमाका होणारच.

याबद्दल माहिती खुद्द गुरु रांधवानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आता फॅन्स कपिल आणि गुरुला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. कपिल शर्मा आणि गुरु रंधावाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आगामी अल्बमचे पोस्टर शेअर केले असून, कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आम्ही तुमच्यासोबत आमच्या ‘अलोन’ची घोषणा करण्यासाटःई खूपच उत्सुक आहोत. संपूर्ण जगाला या अल्बममधील गाणी ऐकवण्यासाठी मी खूपच आनंदी आहे. हे गाणं कपिल शर्मा यांचे पहिलेच गाणे असेल. हे गाणे ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

गुरु आणि कपिलने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये दोघांचा एकदम रॉकिंग लूक पाहायला मिळत आहे. एकीकडे गुरूने काळ्या रंगाचे स्वेटर घातले असून, मॅचिंग कोट आणि ग्लव्स घातले आहे, तर दुसरीकडे कपिलने काळ्या रंगाच्या टीशर्ट सोबत ब्राऊन रंगाचा कोट आणि गॉगल घातला असून, यात तो एकदम स्मार्ट डॅशिंग दिसत आहे.

गुरु आणि कपिलच्या या घोषणेनंतर इंडस्ट्रीमधील लोकांसोबतच नेटकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा देत गाण्यासाठी आता वाट पाहू शकत नसल्याचे सांगितले आहे. रॅपर असणाऱ्या बादशाहने लिहिले, “क्या बात है। वाह, एकाच फ्रेममध्ये दोन रॉकस्टार.” तर राघव सच्चर यांनी लिहिले, “वाह” इतर सर्वानी कमेंट्स करत गाणे लवकर प्रदर्शित करण्याची विनंती केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठ रंगकर्मींवर झाडू मारण्याची वेळ, अंशुमनने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप
‘ते कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केले’, म्हणणाऱ्या हेमांगी कवीची शाहरुख खानबद्दलची ‘ती’ पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा