Monday, June 24, 2024

लाईफ हो तो ऐसी ! महागड्या गाड्यांसह कपिल शर्मा जगतो रॉयल आयुष्य, पाहा इनसाईड फोटो

कपिल शर्मा (kapil Sharma) ज्याने कॉमेडी शो जिंकला आणि स्वतःचा कॉमेडी शो सुरू केला. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ (2007) जिंकल्यानंतर कपिलने टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि ‘कॉमेडी सर्कस’ नावाचा शो अनेक वेळा जिंकला. कपिल शर्माने आपल्या विनोदबुद्धीने लोकांची मने जिंकली आणि आज तो सर्वात यशस्वी कॉमेडियन बनला आहे.

वयाच्या 41 व्या वर्षी कपिल शर्माने केवळ प्रसिद्धीच नाही तर अब्जावधींची संपत्तीही कमावली आहे. मुंबई आणि पंजाबमध्ये आलिशान बंगल्यांशिवाय कपिल शर्माकडे अनेक आलिशान कार आहेत आणि तो उत्तम जीवनशैली जगतो.

कपिल शर्मा केवळ कॉमेडियनच नाही तर टीव्ही होस्टही आहे. कपिलने 2015 मध्ये आलेल्या ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने आणखी काही चित्रपट केले आणि त्यादरम्यान त्यांनी स्वतःची निर्मिती संस्थाही सुरू केली.

कपिल शर्माने त्याच्या कंपनीअंतर्गत ‘कॉमेडी शो’ आणि चित्रपटांची निर्मितीही केली. कपिलचे पंजाबमध्ये आलिशान फार्महाऊस असून मुंबईत त्याचे स्वतःचे अपार्टमेंटही आहे. कपिल शर्माचे मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे एक आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याचे फोटो कपिल शर्मा अनेकदा शेअर करत असतो. कपिल शर्माच्या मुंबईतील अपार्टमेंटची किंमत 15 कोटी रुपये आहे.

कपिल शर्माचे पंजाबमध्ये फार्महाऊसही आहे. कपिल शर्माचे फार्महाऊस चंदीगड, पंजाबमध्ये बांधले गेले आहे, ज्याची किंमत सुमारे 25 कोटी रुपये आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कार्तिक आर्यनला मोठा धक्का; पहिल्याच दिवशी चंदू चॅम्पियनची उडाली हवा
अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमली, या चित्रपटात दिसणार एकत्र

हे देखील वाचा