Friday, April 18, 2025
Home अन्य ‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

कॉमेडियन कपिल शर्माने कमी वेळातच खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ‘द कपिल शर्मा’ या शोमुळे तो घराघरात पोहोचला आहे. या शोमधून तो प्रेक्षकांना कायम हसवत असतो. सध्या कपिल शर्मा याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा फोटो त्याच्या कॉलेजच्या काळातील आहे.

वास्तविक, त्याने आपला २३ वर्षांपूर्वीचा जुना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्यासंदर्भातील गोष्ट देखील सांगितली आहे. जुने दिवस आठवत त्याने लिहिले, “तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण चेहऱ्यावर कायम एक स्मित हास्य असायचे.”

कपिल शर्मा लिहितो, “२३ वर्ष जुना फोटो सापडला. ‘आझादी’ नाटक सादर केल्यानंतरचा हा फोटो आहे. हे नाटक मी श्री गुरू नानक देव युनिव्हर्सिटी, युवा महोत्सवात सादर केले होते. मी माझी दाढी काढून हा फोटो काढला आहे. फोटो काढून घ्यायला, तेव्हा फार मजेदार वाटायचे. मला माहित नव्हते की, माझ्या चेहऱ्यावर अजूनही डिंक लागले होते. मला अजूनही त्या दिवसाची आठवण येते. खिसा रिकामा असायचा, पण चेहऱ्यावर कायम एक स्मित असायचे. मला वाटले की, मी हे तुमच्याबरोबर शेअर करावे. तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल.’

कपिलच्या या पोस्टवर कलाकारांनी आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या या स्मित हास्याचे कौतुक केले आहे. मित्राने लिहिले, ‘आयुष्याच्या आठवणी’, नंतर एकाने लिहिले, ‘मनमोहक हास्य.’ कपिलच्या दुसर्‍या मित्राने लिहिले, ‘पाजी, सगळ्यात छान दिवस… मला ते दिवस खरोखर आठवतात. रिकाम्या खिशामुळे कायम राजासारखे वाटायचे.’

कपिल शर्माने बर्‍याच दिवसानंतर, आपल्या आयुष्याशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अलीकडेच कपिल दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी गिन्नी चतरथने एका मुलाला जन्म दिला आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव त्रिशान ठेवले आहे.

याशिवाय त्यांना अनायरा नावाची एक मुलगीही आहे. ‘द कपिल शर्मा’ शोचे शूटिंग संपते, तेव्हा कपिल त्यातून पूर्णतः बाहेर पडत असतो. तसेच आपल्या कुटूंबासमवेत वेळ घालवतो. ‘द कपिल शर्मा’ शोचे शूटिंग लवकरच सुरू होणार होते. मात्र, कोरोनामुळे हा शो पुढे जाऊ शकला नाही, तेव्हा मार्चमध्ये या शोच्या पुनरागमनाबद्दल चर्चा होती. सर्व काही ठीक असल्यास जूनमध्ये कपिल पुन्हा सर्वांना हसवण्यासाठी परत येईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सामान्य व्यक्तींनंतर आता सेलिब्रिटींच्या मदतीलाही धावला सोनू सूद; ‘भज्जी’ हरभजन सिंगला दिले मदतीचे आश्वासन

-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे

हे देखील वाचा