सामान्य व्यक्तींनंतर आता सेलिब्रिटींच्या मदतीलाही धावला सोनू सूद; ‘भज्जी’ हरभजन सिंगला दिले मदतीचे आश्वासन

bollywood harbhajan singh asked for remdesivir injection for covid 19 patient sonu sood said bhaji will be delivered


कोरोना काळात अभिनेता सोनू सूद लोकांसाठी मसीहा बनला आहे. गेल्या वर्षभरापासून तो सर्वांना मदत करण्यासाठी सतत काम करत आहे. तो गरजूंना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आता केवळ सर्व सामान्यच नव्हे, तर मोठमोठे सेलेब्रिटीसुद्धा अभिनेत्याकडे मदतीची विनंती करत आहेत. नुकतेच क्रिकेटपटू सुरेश रैनाने केलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या ट्वीटवर, सोनूने मदतीचे आश्वासन दिले होते. त्याचवेळी आता क्रिकेटपटू हरभजन सिंगने सोशल मीडियावर मदतीची मागणी केली आहे. त्यानंतर सोनूने त्यालाही मदतीचे आश्वासन दिले आहे.

खरं तर, क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंटवर, कर्नाटकातील एका रूग्णासाठी रेमेडिसिविर इंजेक्शनची मदत मागितली होती. यावेळी त्याने रुग्णालयाचा पत्ताही दिला होता. हरभजनने लिहिले की, “रेमेडिसिविर इंजेक्शनची नितांत आवश्यकता आहे. ऐश्वर्या किल्ल्याजवळील बसाप्पा हॉस्पिटल. चित्रदुर्ग कर्नाटक.”

त्यानंतर लगेचच सोनू सूदने त्याच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले. त्याने लिहिले की, “भज्जी पोहोचून जाईल.” यापूर्वीही सोनू सूदने क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकूसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली होती. सोनूची टीम रात्रंदिवस अशा मदतकार्यात गुंतलेली आहे. त्याचबरोबर काही सेलेब्रिटीही त्याच्या फाऊंडेशनला मदत करत आहेत. अलीकडेच, सारा अली खानने दिलेल्या मदतनिधीबद्दल अभिनेत्याने तिचे अभिनंदन आणि कौतुक केले.

नुकतेच सोनू सूदने देशवासीयांच्या मदतीसाठी फ्रान्सकडून ऑक्सिजन प्लांटची मागणी केली आहे. स्वत: सोनूने याबाबत माहिती दिली. तो म्हणाला की, “देशात ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेत, अनेक ऑक्सिजन प्लांटची ऑर्डर देण्यात आली आहे. यामुळे देशभरात असलेल्या ऑक्सिजनच्या कमतरतेवर तोडगा निघू शकेल. सर्व काही वेळेत होईल.”

सोनू पुढे म्हणाला की, “आपण पाहत आहोत की, ऑक्सिजन सिलिंडरच्या अभावी अनेक रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ऑक्सिजन सिलिंडर्सना असेच रुग्णालयात नेले जाणार नाही, तर ते पूर्ण भरले जातील. यावेळी सर्वात महत्वाचे आहे की, गोष्टी योग्य वेळेत केल्या जाव्या. जेणेकरून आपण आणखी लोकांना गमावू नये.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवीन संगीतकार जोडी श्रोत्यांच्या भेटीला! ‘या’ फेसबुक पेजवरून गुरुवारी जाणार लाईव्ह, पाहा कसा सुरू झाला श्रेयसी अन् शौनक यांचा प्रवास

-‘काळ्या चिमण्या दिसंना झाल्यात, आवरा राव थोडंसं’, शालूचा डान्स पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे


Leave A Reply

Your email address will not be published.