Tuesday, December 23, 2025
Home अन्य नशेत धुंद होऊन केलेलं ट्वीट कपिल शर्माला पडलं होतं भलतंच महागात; म्हणाला, ‘मालदीवला पळून जावं लागलं…’

नशेत धुंद होऊन केलेलं ट्वीट कपिल शर्माला पडलं होतं भलतंच महागात; म्हणाला, ‘मालदीवला पळून जावं लागलं…’

‘द कपिल शर्मा शो’चा होस्ट आणि कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) नेटफ्लिक्स प्रोजेक्टचा ट्रेलर बुधवारी (५ जानेवारी) रिलीझ झाला आहे. ट्रेलर आल्यानंतर कपिल शर्माने सोशल मीडियावर आणखी एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये तो त्याच्या एका वादग्रस्त ट्वीटवर विनोद करताना दिसत आहे. कपिलने व्हिडिओसोबत कॅप्शनही लिहिले आहे की, “मी एक छोटासा फुटेज लीक केल्याचे नेटफ्लिक्सला सांगू नका.”

कपिल शर्मा कोणाचेही नाव न घेता व्हिडिओमध्ये म्हणतो, “मी ताबडतोब मालदीवला रवाना झालो, पोहोचताच मी म्हणालो, मला एक खोली द्या जिथे इंटरनेट नसेल. तू लग्न करून आला आहेस का, असे मला विचारले गेले. मी म्हणालो, मी ट्वीट करून आलो आहे.” कपिल शर्मा पुढे म्हणाला, “तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी तिथे जितके दिवस राहिलो, मी नऊ लाख रुपये खर्च केले. माझ्या आयुष्यातील पूर्ण शिक्षणाला इतका खर्च केला नाही, जितका ती एक ओळ लिहून मी खर्च केला.” (kapil sharma stand up show m not done yet trailer kapil pm modi tweet controversy)

कपिल शर्मा व्हिडिओमध्ये पुढे म्हणतो, “मला ट्विटरवर एक केस करायची आहे, कारण ट्विटर लोक कोणत्याही राजकारण्याच्या ट्वीटखाली लिहितात ना मॅनिपुलेट केलेले ट्वीट. तर माझ्या ट्वीटखालीही लिहिले असते की, पिऊन ट्वीट केलं आहे, दुर्लक्ष करा, तर माझे पैसे वाचले असते.” कपिल व्हिडिओमध्ये पुढे म्हणतोय, “मला आपल्या देशाची ही व्यवस्था समजत नाही की, मी रात्री काही बोललो तर तुम्हीही माझ्याशी रात्रीच बोला, विषय संपवा. कारण सकाळी माझी विचारधारा वेगळी असते.”

कॉमेडियन कपिल शर्मा व्हिडिओमध्ये सांगत आहे की, त्याने वादग्रस्त केलेले सर्व ट्वीट त्याचे नव्हते, काही जॅक डॅनियलचे होते, तर काही जॉनी वॉकरचे होते. तो म्हणतो की, “काही माझे होते पण काही छोट्या गोष्टींसाठी कलाकाराला ब्लॅक लेबल लावले, म्हणजे ब्लॅकलिस्ट करू शकत नाही ना.” कॉमेडियने असे बोलताच प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. कपिल शर्माचा शो ‘एम नॉट डन येट’ २८ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा :

मायरा वैकुळने ‘केळेवाली’ गाण्यावर केला असा डान्स की, सोनाली कुलकर्णीने देखील केली भन्नाट कमेंट

विवाहित असून पवन सिंग करत होता एक्स गर्लफ्रेंडसोबत रिलेशनमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त, विवादात होती गायकाची लव्हलाईफ

जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

हे देखील वाचा