Wednesday, July 3, 2024

‘आम्ही जातोय म्हणून तर तुमचा शो…’, म्हणत कपिल शर्माने खेचली अर्चना पुरण सिंग यांची टांग

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात जास्त लोकप्रिय आणि तुफान प्रसिद्ध असणारा द कपिल शर्मा शो नुकताच बंद झाला. ५ जून रोजी या शोचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. या भागात ‘जुग जुग जियो’ या सिनेमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावत शेवटचा भाग अधिक जास्त दिमागदर केला. वरुण धवन, कियारा अडवाणी, नितु कपूर, अनिल कपूर, मनीष पॉल, प्राजक्ता कोळी आदी कलाकारांनी हजेरी लावत हा भाग अविस्मरणीय केला. शोमध्ये नेहमीच कपिल अर्चना पूर्ण सिंग यांची टांग खेचताना दिसतो. अर्चना यांच्यावर तो नेहमीच विनोद करतो. शेवटच्या भागात देखील तो त्याची हि परंपरा कायम राखताना दिसला. या भागातही त्याने त्यांना खूप त्रास देखील दिला.

द कपिल शर्मा शो मध्ये शेवटच्या भागाच्या दिवशी शो संपल्यानंतर जेव्हा सर्व स्टेजवर आले तेव्हा अर्चना पूर्ण सिंग यांनी सांगितले की. त्यांचा इंडियन लाफ्टर चॅम्पियन हा शो येत आहे. यावर लगेच कपिल शर्मा त्यांच्यावर पंच मारत म्हणाला, “आम्ही जात आहोत म्हणूनच तर तुमचा शो येत आहे. आम्ही थांबू का?” हे ऐकून तिथे असलेले सर्वच लोकं जोरजोरात हसू लागले. कपिल शर्माच्या शोच्या जागी अर्चना पुरण सिंग आणि शेखर सुमन हे परीक्षक असलेला ‘इंडियन लाफ्टर चॅम्पियन’ हा शो येत आहे. या शोचे प्रोमो सध्या टीव्हीवर तुफान गाजत असून, सर्वच लोकांना आता या नवीन शोबद्दल उत्सुकता लागली आहे.

तत्पूर्वी कपिल शर्माचा हा शो त्याने केवळ ३ महिन्यांसाठी सुरु केला होता. मात्र या तीन महिन्यांमध्ये शोला मिळालेला प्रतिसाद अमाप होता. त्याच जोरावर हा शो मागील नऊ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या शोचा जरी शेवटचा भाग प्रसारित झाला असला तरी शो कायमचा संपलेला नाही. थोड्या कालावधीसाठी त्यांनी ब्रेक घेतला असून, कपिल आणि त्याची टीम प्रोफेशनल टूरसाठी अमेरिकेला जात आहे. कपिलसोबत सुमोना चक्रवर्ती, कृष्णा अभिषेक, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर देखील जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा