Wednesday, June 26, 2024

कपिलच्या इंग्रजीची खिल्ली उडवणाऱ्यांची काॅमेडियनने केली ‘ऐशी तैशी’, पाहा व्हिडिओ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमिडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या ‘झ्वीगाटो’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याने डिलिव्हरी मॅनची भूमिका साकारली आहे. चित्रपटच प्रीमियर दक्षिण कोरियातील 27 व्या ‘बुसान आंतरराष्ट्रीय महोत्सवा’त झाल. कपिलने आता बुसानमधून स्वतःचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या चित्रपटाच्या दिग्दर्शक नंदिता दास आणि पत्नी गिन्नी चतरथसोबत दिसत आहे.

व्हिडिओमध्ये कपिल (kapil sharma) बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलबद्दल इंग्लिशमध्ये सांगत आहे आणि नंतर असे काही बोलतो की, तिथे उपस्थित प्रत्येकजण हसतो.ज्यांना असे वाटते की, त्याला इंग्रजी बोलता येत नाही ते त्याच्यासाठी उत्तर आहे. कपिलने व्हिडिओच्या माध्यमातून दक्षिण कोरियातील अद्भुत क्षणांची झलकही दाखवली आहे. नंदिता दासची मस्ती भरलेली स्टाइल पाहायला मिळत आहे. कपिल शर्माला येथे कोणी ओळखत नसल्याचे ती सांगत आहे.

व्हिडिओ होत आहे व्हायरल
कॉमेडियनने एक तासापूर्वीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर 51 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. कपिलचे चाहते कमेंट करून भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.कपिलने नुकतेच त्याच्या चित्रपटाबद्दल खुलेपणाने बोलला. एका मुलखातील दरम्यान कपिल म्हणाला, “मी माझ्या पत्नीला सांगितले की, जर हा चित्रपट चालला नाही, तर मी काही गमावणार नाही, परंतु जर तो यशस्वी झाला आणि हिट झाला, तर मला त्यातून बरेच काही मिळेल. लोक म्हणतील की, कपिलने खूप छान काम केले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिल शर्माला त्याचे ‘दुकान’ वाढवायचे आहे.
अभिनेता पुढे म्हणाला, ‘कॉमेडी शो हे माझे ब्रेड अँड बटर आहेत, त्यामुळं मला काहीतरी वेगळं एक्सप्लोर करण्याची प्रेरणा मिळाली आहे. म्हणून विचार केला की, किचन सेफच का नाही. कुणी विचारलं तुला भीती वाटत नाही का? मी म्हणालो मी कशाला घाबरू? ते दुकान, तर स्वबळावर चालू आहे. मी आता त्याला जोड व्यवसाय करत आहे.

कपिलच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले, तर कपिल ‘झ्वीगाटो’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कपिल सध्या ‘द कपिल शर्मा शो’ होस्ट करत आहे. त्याने 2015 मध्ये ‘किस किसको प्यार करूं’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबद्दल खळबळजनक बातमी, सायबर पोलिस प्रकरण
एकदम गुपचूप कारभार! लग्नाच्या 4 महिन्यात अभिनेत्री नयनतारा बनलीये जुळ्या मुलांची आई, विश्वास नसेल तर फोटो पाहा

हे देखील वाचा