Friday, March 29, 2024

‘बिग बॉस’ने बदललं सृष्टीचं आयुष्य, झालेला साखरपुडा मोडून आता बनलीय कपिल शर्माची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड

टीव्ही दुनियेतील लोकप्रिय अभिनेत्री सृष्टी रोडे हिने अनेक मालिकामध्ये काम केले आहे. मात्र, ‘बिग बॉस 12’ या कार्यक्रमाने तिला खरी ओळख मिळवून दिली. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सुंदर आणि ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. शनिवारी (दि. 24 सप्टेंबर) सृष्टीने तिचा 31वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

सृष्टी रोडे (Srishty Rode) हिने 2007 साली ‘कुछ इस तरह’ या टीव्ही मालिकेपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने अनेक मालिकांमध्येही काम केले होते. ‘फिर कोई हैं’, ‘बैरी पिया’, आणि ‘इश्क हाय’ यांसारख्या लोकप्रिय मालिकामध्ये ती झळकली होती. यानंतर तिने ‘छोटी बहू’, ‘स्वर के रंग राची’, ‘पुनर्विवाह’, ‘सरस्वती चंद्र’ अशा मालिकेतही काम केले होते. मात्र, ‘इश्कबाज’ या मालिकेमधून ती घराघरात पोहोचली. यानंतर सृष्टीला ‘बिग बॉस12’ मध्ये जाण्याची संधी मिळाली. मात्र, या कार्यक्रमामध्ये तिला फक्त 70 दिवसच काढता आले.

सृष्टी रोडे ‘बिग बॉस 12’ची स्पर्धक राहिली आहे. या कार्यक्रमामुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती, जणू काय तिचे आयुष्यच बदलेले होते. तिने या कार्यक्रमामध्ये येण्याच्या आधी टीव्ही अभिनेता मनीष नागदेव (Manish Naggdev) सोबत साखरपुढा केला होता. काही दिवस यांचे नाते चांगले चालले होते. मात्र, काही कारणांनी सृष्टी रोडेने आपला साखरपुढा मोडून टाकला. त्यामुळे दोघेही खूपच चर्चेत आले होते.

सृष्टी रोडे गेल्या तीन वर्षांपासून अभिनय क्षेत्रापसून गायब झाली होती. ‘बिग बॉस 12’ नंतर तिने कोणत्याच कार्यक्रमामध्ये काम केले नाही. तिने ‘बिग बॉस’मध्ये जरी कमी दिवस काढले असतील, पण या कार्यक्रमामध्ये ती खूपच प्रसिद्ध झाली होती, आणि तिचे खूप चाहते निर्माण झाले होते. सृष्टी अभिनेता मनीषसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2018 मध्ये त्यांनी साखरपुडाही केला होता, वर्षाच्या शेवटी ते लग्नही करणार होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Srishty Rode (@srishtyrode24)

चाहते सृष्टी रोडे आणि मनीष यांच्या लग्नासाठी खूपच उत्सुक होते. मात्र, बिग बॉसच्या घरामध्ये सृष्टीला रोहित सुचांती (Rohit Suchanti) आवडू लागला आणि या दोघांची जवळीकही वाढली होती. त्यामुळे सृष्टीने बिग बॉसच्या घरामधून बाहेर आल्यावर तिने मनीषसोबत झालेला साखरपुढा मोडून टाकला आणि राहुल सुचांतीला डेट करू लागली. सृष्टी आता मोठ्या ब्रेकनंतर ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) यामध्ये ती ऑनस्क्रीन कपिल शर्माची गर्लफ्रेंड म्हणून पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमामध्ये तिची आणि कपिल शर्माची केमिस्ट्री खूपच चांगली दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांना बेधुंद करणारा अमलाचा हॉट लूक, फोटो पाहून काळजात वाजेल घंटी
तेजस्वीला घर खरेदी करून देण्यात करण कुंद्राचा मोठा हात? आगपाखड करत अभिनेता म्हणाला, ‘ती माझ्या…’
वाऱ्याची एकच झुळूक अन् उर्फीचा खेळच खल्लास! सगळ्यांसमोर अशी झाली अभिनेत्रीची फजिती, नेटकरीही भडकले

हे देखील वाचा