कपिल शर्मा, कप्पू शर्मा, कपिल, कपिल पाजी अशा अनेक नावांनी आपण या विनोदवीराला ओळखतो. आज संपूर्ण भारत नव्हे तर संपूर्ण जग या वेड्या माणसाच्या प्रेमात आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत आपला कपिल शर्मा जाऊन पोहोचला आहे. कपिलच्या शो मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, बॉलिवूड सेलिब्रिटीज, जॅकी चॅन सारख्या व्यक्ती येऊन गेल्या आहेत. यावरूनच आपल्याला कपिलच्या प्रसिद्धीची जाणीव होते. बॉलिवूडच्या प्रत्येक कलाकाराचं यश आणि प्रसिद्धीनुसार ट्रान्सफरमेशन होत जातं. कपिलचं देखील झालं आहे. लॉकडाऊनच्याच काळात कपिलनस त्याच न किलो वजन कमी केलं. पाहुयात कसं ते.
Let's laugh and sing together tonight at 9:30 PM on @SonyTV at #TheKapilSharmaShow
Thank you @KapilSharmaK9 and @archana mam ❤️???? for a wonderful evening.
Don't forget to tune in!#TulsiKumar #Tanhaai #Tonight #Tkians #SonyTv #KapilSharma pic.twitter.com/vZTbEA6pP4
— Tulsi Kumar (@TulsikumarTK) December 6, 2020
कपिलचं वजन जवळपास ९२ किलोपर्यंत गेलं होतं. लॉकडाऊनमध्ये जेव्हा त्याला वेळ मिळाला तेव्हा त्याने स्वतःच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं. परिणामी कपिलचं वजन कमी होऊन ८१ किलो झालं आहे. नुकतेच त्याचे हे फोटो कपिलने इनस्टाग्रामवर टाकले आहेत. ज्यात कपिल एकदम हँडसम दिसत आहे. शो ची नियमित पाहुणी अर्चना पुरण सिंह हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता सोशल मीडियावर त्यात तिने कपिल ने वजन कमी केल्याचं सांगितलं होतं. लोकडाऊन मुळे कपिलच्या शोचं शूटिंग पूर्णतः बंद होतं. नव्या नियमांनुसार प्रेक्षकांच्या जागी त्यांचे कटाऊट लावलेले आपल्याला पाहायला मिळतात.
Had a wonderful time at #TheKapilSharmaShow. @KapilSharmaK9 paji and the team are just incredible. Hope you all enjoy the show as much as we did. ???? pic.twitter.com/Pp0sHZ0Lvx
— Akshar Patel (@akshar2026) December 1, 2020
२००६ मध्ये कपिल ने ‘हंस दे हसा दे’ नावाचा कार्यक्रम केला. यानंतर पुढच्याच वर्षी त्याला ‘द ग्रेट इंडिया लाफ्टर चॅलेंज’ नावाच्या कार्यक्रमात मोठा ब्रेक मिळाला. या शोचा तो विजेता देखील बनला. मग काय यश कपिलच्या सोबतच होतं. २०१० ते २०१३ यादरम्यान त्याने कॉमेडी सर्कस या शोचं सलग सहा सिजन केले आणि तो अबाधित विजेता देखील राहिला.मग पुढे जाऊन कपिल ने ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ हा स्वतःचा कार्यक्रम लॉन्च केला. त्यांनतर काही कारणास्तव हा शो बंद झाला. पुढे दुसऱ्या एका वाहिनीवर कपिल ने ‘ द कपिल शर्मा शो’ या नावाने नवा शो सुरू केला आणि अजूनही हा कार्यक्रम दिमाखात सुरूच आहे.
No caption needed ????@KapilSharmaK9 giving fitness goals & getting hotter day by day! Hard working Sharma Ji.???? We love you! #KapilSharma pic.twitter.com/rrN0V9IL9c
— Kapil FC Delhi ❤️ (@KapilFansDelhi) December 1, 2020
Just like that ????
#shooting #tkss #kapilsharma #fitness #showtime #thekapilsharmashow #comedy #laughter #fun #lightscameraaction #gratitude #???? pic.twitter.com/aczfdYzRoy— Kapil Sharma (@KapilSharmaK9) November 27, 2020
कपिलचं सुरुवातीचं आयुष्य खूप संघर्षमय होतं. त्याचे वडील पोलिसात हवालदार म्हणून काम करायचे. त्यात हे तीघे जण भाऊ बहीण… कॅन्सरमुळे कपिलच्या वडिलांचा मृत्यू झाला. आता कपिल त्याची आई, पत्नी आणि मुलीसह मुंबईत राहतो. बतम्यांनुसार कपिल पुन्हा एकदा बाबा होणार आहे. परंतु कपिल ने अधिकृतरित्या या बातमीस नकार दिला आहे.