कपिल शर्माच्या मुलीने केला हनी सिंगच्या गाण्यावर डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, हाऊ क्यूट!!


कपिल शर्मा पडद्यावर जेवढ्या जबाबदारीने आणि उत्साहाने सगळ्यांचे मनोरंजन करत असतो.तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील आपली जबाबदारी काटेकोरपणे बजावताना दिसत आहे. एका विनोदी कलाकारासोबत तो एका उत्कृष्ट पती आणि वडिलांची भूमिका अत्यंत उत्तम रीतीने निभावत असतो.

कपिल शर्माने गिन्नी चतरथ हीच्यासोबत 2018 रोजी विवाह केला. 2010 मध्ये त्यांनी ‘अनायरा’ या चिमुकलीला जन्म दिला. कपिल आणि गिन्नी हे दोघेही नेहमीच आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. कपिल सोबतच आता त्याचे चाहते देखील त्याच्या मुलीवर खूप प्रेम करतात. नुकताच त्याने अनायराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल आहे, ज्या व्हिडीओला खूपच प्रेम मिळत आहे.

कपिलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अनायरा एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिने ब्ल्यू कलरचा नाईट सूट घातला आहे. ती हनी सिंगच्या जिंगल बेल या गाण्यावर टाळ्या वाजवत डान्स करत आहे. हा इंटरनेटवरील सर्वात क्यूट व्हिडीओ असावा, याबाबत नक्कीच कोणाचं दुमत नसेल. या व्हिडिओला शेअर करता कपिलने ‘लिटिल रॉकस्टार’ असे कॅप्शन दिले आहे.

आता छोटी‌ अनायरा ही तिच्या आईवडिलांनी लहान नाही तर आता कोणाची तरी मोठी बहीण देखील झाली आहे. नुकताच कपिल आणि गिन्नीने त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले आहे. या गोड बातमीमुळे अनेक कलाकार त्यांना इंटरनेटवरून शुभेच्छा देताना दिसत आहे.

कपिल शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आताच एक घोषणा केली आहे. तो लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.