Thursday, April 18, 2024

लग्न तर झालं, पण किती दिवस टिकणार? कपूरांचे विवाह काही वर्षेच टिकतात, तर भट्ट घराण्यात दोन लग्नांची परंपरा

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाच्या बातमीने सध्या बॉलिवूड जगतात सर्वत्र चर्चा रंगली आहे. या शाही विवाह सोहळ्याची अनेकांना उत्सुकता लागली होती.  या लग्नाने हिंदी चित्रपट जगतातील कपूर आणि भट्ट ही दोन्ही मोठी कुटूंबे एकत्र आली आहेत. भारतीय  चित्रपट जगतात कपूर आणि भट्ट घराण्याचे अनमोल योगदान राहिले आहे. त्यामुळे कपूर घराण्याची लाडकी सूनबाई होणाऱ्या आलियाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र त्याआधी  कपूर आणि भट्ट घराण्याचा एक परंपरागत इतिहासही चर्चेत आला आहे. तो म्हणजे कपूर घराण्यात जास्तीत जास्त प्रेमविवाह करण्याची परंपरा आजपर्यंतची आहे तसेच भट्ट फॅमिलीमध्येही दोन लग्न करण्याचा इतिहास आहे. त्यामुळे आता आलिया – रणबीरचा विवाह टिकणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.  त्याआधी पाहूया कपूर घराण्याचा इतिहास.

पृथ्वीराज कपूर – कपूर घराण्यातील पहिले अभिनेते म्हणून पृथ्वीराज कपूर यांची ओळख आहे. १८ व्या वर्षी त्यांचा विवाह रामसरनी  मेहताशी झाला होता. त्यांना राज कपूर, शम्मी कपूर आणि शशि कपूर अशी तीन मुले झाली. तसेच उर्मिला कपूर नावाची एक मुलगीही त्यांना आहे.

राज कपूर – अभिनेते राज कपूर यांचा विवाह १९४६ मध्ये कृष्णा मल्होत्रासोबत झाला होता. त्यांना रणधीर, ऋषी, राजीव, रीमा आणि ऋतू अशी पाच मुले झाली. राज कपूर आणि नरगिसचे अनेक वर्ष प्रेमप्रकरण चालले होते.

शम्मी कपूर –  शम्मी कपूर यांचे पहिले लग्न गीता बालीसोबत झाले होते.  त्यांची ओळख रंगीन रातें या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.  मात्र लग्नाच्या १० वर्षानंतर तिचे दुःखद निधन झाले.  त्यामुळे त्यांनी दुसरे लग्न नीलादेवीसोबत केले होते.

शशी कपूर – शशी कपूरने जेनिफर केंडलसोबत झाले होते. त्यांना कुणाल, करण, आणि संजना अशी तीन मुले झाली. १९८४ मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले.

ऋषी कपूर – ऋषी कपूर आणि नितू कपूर यांचा १९८९ मध्ये विवाह झाला.  दोघेही पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांना रणबीर आणि रिद्धिमा अशी दोन मुले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा