बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आजकाल तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. जान्हवी कपूर तिच्या वाढदिवशी शहराबाहेर गेली होती. नुकताच, तिचा विमानतळावरील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचा मॅनेजर तिच्या एका चाहत्यासोबत गैरवर्तन करताना दिसला. अशा परिस्थितीत जान्हवी कपूरने असे काहीतरी केले, ज्यामुळे हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
जान्हवीचा हा व्हिडिओ मुंबईला परततानाचा आहे. जान्हवीला पाहिल्यानंतर काही चाहते तिच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी एका व्यक्तीने जान्हवीच्या जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या मॅनेजरने चाहत्याचा हात जोरात झटकला आणि म्हणाला, “बंद करा यार!”
https://www.instagram.com/p/CMJJpSJhDFk/?utm_source=ig_web_copy_link
आता अशा परिस्थितीत बहुतेक सेलेब्स या गोष्टीकडे दुर्लक्ष करून, पुढे निघून जातात. पण जान्हवी मात्र थांबली आणि लगेच मागे वळली. यानंतर जान्हवीने त्या व्यक्तीकडे जाऊन सेल्फीसाठी पोज दिला. असे वागण्याबद्दल चाहते जान्हवीचे खूप कौतुक करत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की, जान्हवी एक स्टारकिड आहे आणि आता ती स्वत: नायिका बनली आहे. अशा परिस्थितीत चाहत्याबरोबरच्या तिच्या वागण्यावरून असे कळते की, तिच्यात अजिबात गर्व नाही.
यासाठी जान्हवीचे भरभरून कौतुक होत आहे. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मास्क न घातल्याबद्दल अनेकांनी जान्हवीला ट्रोलदेखील केले. त्याचबरोबर बरेच चाहते जान्हवीवरचे प्रेम खुलेआम व्यक्त करत आहेत. फोटो घेतल्यानंतर जान्हवी विमानतळाबाहेर आली आणि फोटोग्राफर्सनी तिच्यासाठी तयार केलेला केकही कापला.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपट लवकरच रिलीझ होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव दिसणार आहेत. राजकुमार आणि जान्हवीची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्साही आहेत. याशिवाय जान्हवी ‘गुड लक जेरी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच ‘दोस्ताना 2’ चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ
-स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश