‘नागीण’ फेम निया शर्माच्या बोल्ड अदांनी घातली काळजात घाव!! चाहत्यांकडून फोटो आणि व्हिडिओला मिळतोय खूपच वाव


हिंदी मालिकांमधील निया शर्मा ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. तिचे एकाहून एक हॉट आणि सेक्सी फोटो नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत असतात. तिची ग्लॅमरस अदा पाहून भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटेल. बोल्ड आणि ब्युटीफूल निया नेहमीच अनेक फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. जेव्हा जेव्हा फॅशन इंडस्ट्रीबद्दल बोललं जातं, तेव्हा नियाच नाव येणार नाही असं कधीच होणार नाही. आपल्या प्रत्येक लूकमुळे ती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.

नियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. वेगवेगळ्या अंदाजातील तिचे फोटो आणि तिचे हावभाव एखाद्याला क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाहीत. नियाने केलेल्या फोटोशूटमुळे काहीवेळा तिला अनेक टीकांचा सामना करावा लागला होता. अनेक वेळा नेटकऱ्यांनी तिला धारेवर सुद्धा धरले होते. तिच्या एका फोटोमध्ये ती कुरूप असल्याची प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली होती. त्यावेळी ती कमेंटच्या माध्यमातून बरीच चर्चेत आली होती. तिला अनेक वेळा कमेंट्सच्या माध्यमातून ट्रोल सुद्धा केले होते. पण त्यांना न जुमानता ती प्रत्युत्तरादाखल नवीन फोटो पुन्हा अपलोड करत असते.

नियाने आपला एक बोल्ड फोटो पुन्हा सोशल मीडियातून चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. त्यात तिची मादक अदा पाहून भले भले जण घायाळ होतील. तिची हॉटनेस तिच्या या फोटोमध्ये आणखीनच भर घालत आहे. तिचे चाहते हे फोटो पाहून कमेंट करायला एकही संधी सोडत नाहीत.

या फोटोसोबत तिने एक छोटा व्हिडिओदेखील पोस्ट केलाय, त्यात तिचा अंदाज अगदी बघण्यासारखा आहे. त्यात काहींनी तिला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर काही तिच्या या व्हिडिओवर तिला भलतेच ट्रोल केले आहे. आपल्या दोन्ही फोटो आणि व्हिडिओत तिला सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. पण नेटकऱ्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेकडे तिनेे नेहमीच दुर्लक्ष केेलेे आहे.

सध्या निया आपल्या ‘जमाई २.०’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘नागीण’ मालिकेतील तिने साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. सन २०१० साली तिने ‘काली’ या मालिकेतून आपल्या करियरला सुरुवात केली होती.

तिची ‘एक हजारो मे मेरी बेहना है’ आणि ‘जमाई राजा’ या मालिकेमुळे तिला नव्याने ओळख निर्माण करून दिली होती. ‘फियर फॅक्टर’ आणि ‘खतरो के खिलाडी’ या चित्रपटात तिने काम केले आहे. याशिवाय ती ‘ट्विस्टेड’ या वेबसीरिजमध्येही झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात


Leave A Reply

Your email address will not be published.