Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड सनी-बॉबीऐवजी करण देओलने का केला धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जन? पुजाऱ्याने सांगितली खरी कारणे

सनी-बॉबीऐवजी करण देओलने का केला धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जन? पुजाऱ्याने सांगितली खरी कारणे

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र देओल (Dharmendra Deol)यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देओल कुटुंबासह बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. धर्मेंद्र खूप काळ आजाराने ग्रस्त होते आणि 10 नोव्हेंबर रोजी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या काळात अनेक इंडस्ट्रीजतील कलाकार त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलला आले होते.

धर्मेंद्रच्या निधनानंतर त्यांच्या अस्थि विसर्जनाची विधी हरिद्वारच्या हरकी पौडीवर पार पडली. नातु करण देओलने हे अस्थि विसर्जन केले, कारण सनी देओल आणि बॉबी देओल काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. सोबत पिंडदानाची पूजा देखील पार पडली. सर्व विधी एका खासगी हॉटेलमध्ये पूर्ण केले गेले. पुजारी रोहित श्रोत्रिय यांनी या विधीची माहिती दिली.

धर्मेंद्रच्या निधनानंतर देओल कुटुंबाने प्रार्थना सभा आयोजित केली होती. या सभेत सनी देओल, बॉबी देओल, करण देओल, अभय देओल आणि संपूर्ण कुटुंब भावनिक दिसले.इंडस्ट्रीतील अनेक कलाकार देखील उपस्थित राहून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसले.

धर्मेंद्र यांच्या अभिनयकौशल्याने, विनोदबुद्धीने आणि चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानामुळे ते सदैव प्रेरणादायी ठरतील. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड शोकात असून चाहत्यांमध्येही त्यांची आठवण कायम आहे. त्यांच्या कलात्मक वारशाची आठवण आणि कौटुंबिक नाते चाहत्यांमध्ये दीर्घकाळ जिवंत राहील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

भारती सिंह-हर्ष लिम्बाचिया; लग्नाच्या आठ वर्षांच्या आठवणी साजऱ्या, सोशल मीडियावर प्रेमाचा इजहार

हे देखील वाचा