Sunday, March 8, 2026
Home बॉलीवूड सोशल मीडियावर ट्रोलिंगला ‘असे’ हाताळतो करण जोहर; म्हणाला, ‘माझ्या लैंगिकतेवर…’

सोशल मीडियावर ट्रोलिंगला ‘असे’ हाताळतो करण जोहर; म्हणाला, ‘माझ्या लैंगिकतेवर…’

‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’, ‘कभी खुशी कभी गम’ यांसारखे मास्टरपीस चित्रपट तुम्ही पाहिलेच असतील. बॉलिवूड इंडस्ट्रीला असे एकापेक्षा एक दमदार चित्रपट देऊन करण जोहरने (Karan Johar) आपले स्थान मिळवले. करण जोहर हे बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने धर्मा प्रोडक्शन अंतर्गत अनेक स्टार किड्स देखील लॉन्च केले आहेत आणि त्यांना स्टार बनवले आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या आयुष्यातील आनंदी क्षण शेअर करत असतो.

सोशल मीडियावर ट्रोल होण्याबाबत व्यक्त केलं मत
एका टॉक शो दरम्यान, जेव्हा करणला त्याच्या सोशल मीडिया पोस्टबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जे तुम्हाला लोकांशी कनेक्ट होण्याची संधी देते आणि माझे हे काम आहे. मी कोण आहे हे मला परिभाषित करते. त्यामुळे एखादा चित्रपट रिलीझ किंवा कोणताही कंटेंट असेल, तर प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतात.” करण म्हणतो की त्याला प्रचंड ट्रोल केले जाते, पण त्याला त्याची पर्वा नाही. (karan johar befitting reply to trolls who mocks him on sexuality)

‘अशा’प्रकारे तो हाताळतो ट्रोलिंग
करण जोहर ट्रोलिंगबद्दल म्हणतो की, “मी नकारात्मकतेची चिंता करणे सोडून दिले आहे. माझे सर्व लक्ष प्रेमावर आहे. जेव्हा मी कमेंट सेक्शन स्कॅन करतो तेव्हा मी तिथेच पाहतो… जिथे लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे, तिथे हार्ट इमोजी आहेत. माझ्या लैंगिकतेवर भाष्य करतानाचे कमेंट्सही मी पाहतो, पण मला त्याचा फरक पडत नाही.” यादरम्यान करण जोहर इतर अनेक गोष्टींबद्दल देखील बोलला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा