Tuesday, February 24, 2026
Home बॉलीवूड आलियाची प्रेग्नेंसी समजताच करण जोहरने केले तोंडभरून कौतुक; म्हणाला, ‘बाळाला मिठीत घेण्यासाठी मी उत्सुक आहे’

आलियाची प्रेग्नेंसी समजताच करण जोहरने केले तोंडभरून कौतुक; म्हणाला, ‘बाळाला मिठीत घेण्यासाठी मी उत्सुक आहे’

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) आता आई होणार आहे. आलियाने १४ एप्रिल २०२२ रोजी रणबीर कपूरसोबत(ranbir kapoor) लग्न केले आणि लग्नाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर अभिनेत्रीने तिच्या गरोदरपणाची बातमी देऊन चाहत्यांना खूश केले. आलियाने तिच्या सोनोग्राफीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही खुशखबर दिली, त्यानंतर चाहत्यांना सेलिब्रिटी आलिया आणि रणबीरचे अभिनंदन करताना दिसले. आता आलियाच्या प्रेग्नेंसीवर चित्रपट निर्माता करण जोहरची (karan johar) प्रतिक्रिया आली आहे. करणने सांगितले की, जेव्हा त्याला आलियाच्या गरोदरपणाची बातमी समजली तेव्हा त्याला अश्रू अनावर झाले होते.

करण जोहरने नुकतीच एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्याने सांगितले की, आलियाच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकून तो रडला होता. करण जोहर म्हणाला, “मला आठवते त्या दिवशी ती माझ्या ऑफिसमध्ये आली होती आणि तेव्हा माझे केस खूप खराब झाले होते आणि मी हुडी घातली होती. म्हणूनच मी डोक्यावर टोपी घातली होती. तितक्यात तिने मला तिच्या गर्भधारणेबद्दल सांगितले. माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि मग तिने लगेच मला मिठी मारली.”

पुढे करण जोहर म्हणाला, “मी आलियाला सांगितले की आलिया तुझे बाळ येणार आहे यावर माझा विश्वास बसत नाही. तो क्षण माझ्यासाठी खरोखरच भावनिक होता.” आलियाबद्दल पुढे बोलताना करण जोहर म्हणाला, “मी आलियाला मुलीपासून एक चांगला कलाकार आणि नंतर एक सशक्त स्त्री बनताना पाहिलं आहे. मला आलियाचा अभिमान वाटतो. ती माझ्यासाठी मुलीसारखी आहे. ती 17 वर्षांची असताना माझ्या ऑफिसमध्ये आली होती. गेली १२ वर्षे आमच्यासाठी खूप खास आहेत. आलियाच्या बाळाला माझ्या मिठीत धरण्यासाठी मी थांबू शकत नाही. तो क्षणही माझ्यासाठी खूप भावूक असणार आहे.”

विशेष म्हणजे करण जोहर त्याचा लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’ चा सातवा सीझन घेऊन येत आहे. हा शो ७ जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट दिसणार आहे. रणवीर सिंग आलियासोबत शोमध्ये प्रवेश करणार आहे. दोघेही लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक क

हेही वाचा-

बास झाली ही वेटिंग! ४ वर्षांनंतर ऐश्वर्या करतेय दमदार पुनरागमन, आगामी सिनेमातील लूक जोरात व्हायरल

‘या’ निर्मात्याला कंगणा रणौतसोबत काम केल्याचा पश्चाताप; म्हणाला, ‘खूप मोठी चूक झाली’

करण जोहरने पुढे केला मदतीचा हात, आसामच्या पुरासाठी दिली लाखोंची मदत

हे देखील वाचा