Monday, June 9, 2025
Home टेलिव्हिजन ‘कॉफी विथ करण’ शो झाला कायमचा बंद, सोशल मीडियावर मीम्सला आला महापूर

‘कॉफी विथ करण’ शो झाला कायमचा बंद, सोशल मीडियावर मीम्सला आला महापूर

कॉफी विथ करण‘ हा बॉलिवूड गॉसिप शोधणाऱ्यांचा आवडता शो प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला होता. मात्र, सहा यशस्वी सीझननंतर हा शो संपला आहे. बुधवारी, चित्रपट निर्माता आणि शोचा होस्ट, करण जोहरने (karan johar) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली. निर्मात्याने खुलासा केला की ‘कॉफी विथ करण’ सातव्या सीझनसह परत येणार नाही.

त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर एक नोट शेअर करताना करण जोहरने लिहिले की, “‘कॉफी विथ करण’ हा माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे कारण आम्ही त्याचे ६ सीझन पूर्ण करत आहोत. आम्ही या शोद्वारे लोकांवर आणि पॉप संस्कृतीवर प्रभाव टाकला आहे. त्यामुळे, मला जड अंतःकरणाने जाहीर करायचे आहे की ‘कॉफी विथ करण’ परत येणार नाही.”

करण जोहरच्या घोषणेपासून सोशल मीडियावर नेटिझन्स त्याला ट्रोल करत आहेत. यासोबतच काही यूजर्स त्यावर प्रतिक्रिया देताना मीम्स शेअर करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा