×

Coffee With Karan Season 7 | सुरू होण्यापुर्वीच करणच्या शोवर होतेय बहिष्कार टाकण्याची मागणी?

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) लवकरच त्याच्या ‘कॉफी विथ करण’ चॅट शोचा सातवा सीझन घेऊन येत आहे. हा चॅट शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या शोमध्ये बॉलिवूड स्टार्स येतात, ज्यांना करण जोहर असे प्रश्न विचारतो, जे ऐकून प्रेक्षकही हैराण होतात. पण हे देखील खरे आहे की, करण जोहरचा हा चॅट शो वेळोवेळी लोकांच्या निशाण्यावर आला आहे. त्याचबरोबर आता सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण सीझन ७’ वरही बहिष्कार टाकण्यात येत असल्याच्या बातम्या येत आहेत. या शोचे नाव सध्या ट्विटरवर ट्रेंड करत असल्याचा दावा केला जात आहे. चला तर मग याबद्दल सत्य जाणून घेऊया.

काही युजर्सने टाकला बहिष्कार
वृत्तानुसार, करण जोहरच्या चॅट शोचे शूटिंग जून महिन्यात सुरू होणार असून, त्यात नवीन बॉलिवूड जोडप्यांना बोलावण्यात येणार आहे. ही बातमी आल्यानंतरच सोशल मीडियावर काही लोकांनी शोवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. काही युजर्सने ट्विटरवर लिहिलं आहे की, ते या शोवर बहिष्कार टाकतील. त्याच वेळी, या चॅट शोशी संबंधित बातम्या समोर आल्यानंतर, युजर्स असेही म्हणत आहेत की, करण जोहर पुन्हा एकदा ए-लिस्टेड कलाकारांना पुढे आणत आहे. (coffee with karan 7 this is the truth of the news of boycott karan johar)

काय आहे ट्विटरवरील ट्रेंडचे सत्य?
सोशल मीडियावर काही लोक करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’ विरोधात नक्कीच बोलले. पण सोशल मीडियावर कोणताही गदारोळ झाला नाही किंवा ट्विटरवर ‘कॉफी विथ करण बॉयकॉट’चा ट्रेंड आला नाही. त्याऐवजी, बहुतेक चाहत्यांना या शोमध्ये येणाऱ्या कलाकारांची नावे जाणून घ्यायची इच्छा आहेत.

‘हे’ कलाकार येऊ शकतात शोमध्ये
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे सध्याचे शेड्यूल पूर्ण केल्यानंतर, करण त्याच्या चॅट शोवर काम सुरू करेल. शोच्या या सीझनमध्ये अक्षय कुमार, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि इतर अनेक सेलिब्रिटी दिसू शकतात. रश्मिका मंदान्नाही ‘मिशन मजनू’मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्री ‘कॉफी विथ करण’मध्येही येऊ शकते. याशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील ‘कॉफी विथ करण सीझन ७’ मध्ये येऊ शकतात.

हेही वाचा

Latest Post