Thursday, June 13, 2024

…म्हणून ‘कॉफी विथ करण’मध्ये येऊ इच्छित नाही रणबीर कपूर, करण जोहरचा खुलासा

करण जोहर (Karan Johar) लवकरच त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोच्या नवीन सीझनसह परतणार आहे. अशा परिस्थितीत या शोचे पहिले पाहुणे आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) असतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण आता करण जोहरने सांगितले आहे की, रणबीर कपूर त्याच्या शोमध्ये येऊ इच्छित नाही. रणबीर चॅट शोमध्ये सहभागी न होण्याचे कारणही करणने दिले आहे.

करण जोहरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोबद्दल सांगितले. करण म्हणाला, “रणबीर कपूरने मला आधीच सांगितले आहे की, मी तुझ्या शोमध्ये येणार नाही. कारण नंतर दीर्घकाळापर्यंत त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. रणबीर म्हणाला, प्लीज मला तुझ्या शोमध्ये बोलवू नकोस. मी तुला खूप प्रेम करतो. शोमध्ये येण्याऐवजी मी तुमच्या घरी गप्पा मारायला आणि कॉफी प्यायला येईन.” (karan johar reveals why ranbir kapoor wont be a part of koffee with karan)

यापूर्वी २०१७ मध्येही रणबीरने या चॅट शोबद्दल अशाच गोष्टी बोलल्या होत्या. करणसोबत ‘ए दिल है मुश्किल’चे शूटिंग केल्यानंतर लगेचच रणबीर एका पॉडकास्टमध्ये म्हणाला होता, “माझ्यासोबत या सीझनमध्ये जबरदस्ती करण्यात आली होती. मी करणला सांगितले होते की, मला यायचे नाही. शोचा निषेध करण्यासाठी मी आणि अनुष्का संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला एकत्र आणणार होतो, कारण ते योग्य नाही.” करणच्या चॅट शोमध्ये सेलेब्स बर्‍याचदा अनेक गोष्टींबद्दल बोलतात, ज्यामुळे खूप वाद-विवाद होतात.

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याच्या ‘ब्रह्मास्त्र पार्ट १’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट्ट, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna) आणि मौनी रॉय (Mouni Roy) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रणबीर ‘ऍनिमल’मध्ये रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika Mandanna) दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा