Tuesday, March 5, 2024

“तिन्ही खानांची जागा कोणीही घेऊ शकत नाही” असं का म्हणाला करण जोहर?

बाॅलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता करण जोहर सध्याला त्याच्या ‘काॅफी विथ करण 8 शो’मुळे खुप चर्चेत आहे.नुकतंच त्याने त्याच्या शोचं शूट पुर्ण केलं आहे. त्याच्या या शोच्या शेवटच्या भागात बाॅलिवुड किडसचा खास मित्र ऑरीने हजेरी लावली होती. निर्माता चित्रपटांसोबतच त्याच्या पर्सनल लाइफबद्दलही अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच एका संभाषणात त्याने सुपरस्टारडमबद्दल त्याचे विचार मांडले आहेत.

तिन्ही खानांची जागा कोणीही घेऊ शकत नाही
संभाषणात सुपरस्टारडमबद्दल त्याचे विचार मांडताना करण म्हणाला, ‘शाहरुख खान(shah rukh khan), सलमान खान(salman khan) आणि आमिर खाननंतर(amir khan) नव्या पिढीतील कलाकार बॉलीवूड इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करू शकणार नाहीत. आजच्या कलाकारांमध्ये जुन्या कलाकारांच्या गुणांचा अभाव आहे. मला वाटत नाही की नवीन अभिनेत्यांमध्ये तीन खानांसारखी क्षमता आहे. शाहरुख खानबद्दल बोलताना निर्माता म्हणाला, “शाहरुखने 2023 साली त्याच्या कारकिर्दीतील तीन सर्वात मोठे हिट चित्रपट दिले आणि पुन्हा एकदा त्याने सुपरस्टार म्हणून आपली ओळख निर्माण केली. नवीन कलाकार हे करू शकत नाहीत कारण ते चित्रपट करण्यापूर्वीच जास्त विचार करतात.”

नवीन कलाकारांबद्दलही बोलला करण जोहर
करण जोहरने(karan johar) त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये नवीन कलाकारांबद्दलचा अनुभव देखील शेअर केला होता. तो म्हणाला होता, ‘मी असं म्हणत नाही की ते चुकीचे आहेत, परंतु ते प्रत्येक दृश्यात चांगले खेळत नाहीत, डायरेक्ट संवादात प्रवेश करु इच्छितात. नवीन कलाकार संपूर्ण कथा तपशीलवार जाणून घेतल्यावरदेखील काम करायचे आहे की नाही हे सांगायला खुप वेळ लावतात. तर जुन्या पिढीतील कलाकारांकडून तुम्हाला तत्काळ उत्तर मिळतं.

करण जोहरचा वर्कफ्रंट
करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, निर्मात्याने सात वर्षांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईदेखील केली. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आलिया भट्ट आणि रणवीर सिंग दिसले होते. त्याच वेळी, आता करण जोहर ‘कॉफी विथ करण सीझन 8’ (koffee with karan) हा रिऍलिटी शो होस्ट करत आहे. नुकतंच त्याने त्याच्या शोचं शूट पुर्ण केलं आहे. मध्यंतरी त्याने घोषणा केली होती की तो ‘रॉकी और रानी…’ (rocky aur rani ki prem kahani)नंतर तो एक ऍक्शन चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. मात्र, त्याने अद्याप याबाबत कोणताही अपडेट शेअर केलेला नाही. दरम्यान करणने त्याच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानसोबत एका चित्रपटात काम करण्याचेही संकेत दिले होते.

हे देखील वाचा