Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आनंदाने आणि अभिमानाने प्रेम व्यक्त करत करण जोहरने लिहिली कियारा आणि सिद्धार्थला एक खास पोस्ट

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल असलेल्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी नुकतीच लगीनगाठ बांधली. राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये मोठ्या धुमधडाक्यात मोजक्या लोकांच्या उपस्थित त्यांनी ७ फेब्रुवारी रोजी लग्न केले. या लग्नाला कियारा आणि सिद्धार्थ यांच्या जवळच्या अतिशय मोजक्या लोकांनाच आमंत्रण दिले होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा होत्या. दोघांकडून कधीच त्यांच्या लग्नाबद्दल अधिकृत माहिती समोर आली नसली तरी मीडियाला याचा सुगावा होताच. या दोघांनी लग्नानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांच्या या लग्नानंतर इंडस्ट्रीमधून आणि फॅन्समधून आता कियारा आणि सिद्धार्थवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अशातच बॉलिवूडमडाजीला प्रसिद्ध, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या करण जोहरने देखील सोशल मीडियावर कियारा आणि सिद्धार्थला एक खास संदेश लिहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करणने त्याच्या पोस्टमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत लिहिले, “मी सिद्धार्थला मागील दीड दशकांपूर्वी भेटलो होतो. तो मला अतिशय शांत, कणखर आणि संवेदनशील वाटला. त्यानंतर मी कियाराला खूप वर्षांनी भेटलो. ती देखील शांत, कणखर आणि संवेदनशील. मग ते दोघं एकमेकांना भेटले. तेव्हाच मला जाणवले की हे दोघं मिळून एक चांगला बाँड तयार करू शकतात आणि एकत्र येत एक उत्तम जादुई स्मरणात राहणारी लव्ह स्टोरी तयार करू शकतात. त्यांना सोबत बघणे हे परंपरा आणि कुटुंबात असलेल्या एका परीकथेसारखे आहे. आज त्यांनी प्रेमाच्या मंडपात वचनं घेतली तेव्हा प्रत्येकाला एक वेगळीच उर्जा जाणवली. मी आनंदाने आणि अभिमानाने त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करत आहे. सिड-कियारा मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो, तुमचं संपूर्ण आयुष्य आजच्याच दिवसासारखं असो.”

तत्पूर्वी सिद्धार्थ आणि कियारा यांनी शेरशहा या सिनेमात एकत्र काम केले असले, तरी त्यांची ओळख आधीपासूनच होती. त्यांनी नेहमीच जगापासून त्यांचे नाते लपवून ठेवले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अजून किती वाट पाहायची! पुन्हा एकदा समंथाच्या ‘शाकुंतलम’ सिनेमाचे प्रदर्शन गेले पुढे

भोजपुरी अभिनेत्री असलेल्या माही श्रीवास्तवच्या ‘ननद अब हद कइली’ गाण्याने घातला धुमाकूळ

हे देखील वाचा