Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

Viral Video: करण जोहरच्या मुलाला आवडत नाही वडिलांची ‘ही’ गोष्ट, तोंडावरच उडवली खिल्ली

करण जोहर (Karan Johr) हा बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक- निर्माता म्हणून ओळखला जातो. सिने जगतात अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करण जोहरने केली आहे. त्यामुळेच त्याला बॉलिवूड कलाकारांच्या मुलांचा तारणहार म्हणून ओळखले जाते. परंतु खुद्द करण जोहरच्याच मुलानेच त्याच्या वडिलांची एक गोष्ट आवडत नसल्याचे सांगत त्याचा तोंडावरच अपमान केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. काय आहे करण जोहरच्या मुलाला ती न आवडणारी गोष्ट चला जाणून घेऊ. 

बॉलिवूड निर्माता करण जोहर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. यावरुन तो मुलगा यश जोहर आणि मुलगी रुही जोहर यांच्यासोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. मुलांसोबतचे अनेक सुंदर क्षणांचे तो व्हिडिओ आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतो. सध्या करण जोहर आणि यश जोहर यांचा असाच एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करण आपल्या मुलाला त्याची कोणती गोष्ट आवडत नाही असे विचारताना दिसत आहे. यावर मुलगा यशनेही त्याच्या समोरच करण जोहरची ती  न आवडणारी सांगितली आहे.

या व्हिडिओमध्ये यशने करण जोहरची पाउट करतानाची स्टाईल दाखवत मला पप्पांची ही स्टाईल अजिबात आवडत नसल्याचे म्हणले आहे. करण जोहरच्या या स्टाईलची यशने चांगलीच खिल्ली उडवलेली दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर फक्त चाहतेच नाही तर अनेक कलाकारांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्वेता बच्चन नंदा, अदिति राव हैदरी, सोफी चौधरी, हुमा कुरेशी या कलाकारांनी  करण जोहरच्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हे देखील वाचा