Saturday, June 29, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ दोन हॉट अभिनेत्रींसह ‘बिग बॉस’च्या घरात बंद होवू इच्छितो करण जोहर; मुलाखतीत व्यक्त केली इच्छा

बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहर लवकरच ‘बिग बॉस OTT’ होस्ट करताना दिसणार आहे. यावेळी करण आपल्या बुद्धी आणि हुशारीने सर्वांचे मनोरंजन करणार आहे. आता भारतातील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉस ओटीटीचे काऊंटडाउन सुरु झाले आहे. अशा परिस्थितीत करण त्याच्या या नव्या भूमिकेबद्दल खूपच उत्साहित आहे. एवढेच नव्हे, तर त्याने त्याच्या बेस्‍टफ्रेंड मलायका अरोरा आणि करीना कपूर खानसोबत या घरात बंद होण्याची इच्छा जाहीर केली आहे.

करण जोहर लवकरच ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करताना दिसणार आहे. गेल्या अनेक सीझनपासून प्रेक्षक सलमान खानला हा शो होस्ट करताना पाहत आहेत. मात्र, पहिल्यांदा हा शो टीव्हीच्या आधी ओटीटीवर प्रसारित केला जाईल आणि करण जोहर त्याच्या ओटीटी आवृत्तीचे सूत्रसंचालन करणार आहे.

बिग बॉस ओटीटी (बिग बॉस ओटीटी) ८ ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि आपण हा शो वूटवर पाहू शकाल. अशा परिस्थितीत, जेव्हा करण जोहरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला की, तो स्वतः या घरात कैद होऊ शकेल का? तर करणने स्पष्ट केले की, ६ आठवडे तर सोडा, तो या घरात त्याच्या फोनशिवाय एक ताससुद्धा राहू शकत नाही. त्याचवेळी, जेव्हा करणला विचारण्यात आले की, कोण दोन सेलिब्रिटी असतील ज्यांच्यासोबत करणला या घरात बंदिस्त राहायला आवडेल. करण जोहरने उत्तर दिले, “मला बेबो (करीना कपूर खान) आणि मल्ला (मलायका अरोरा) यांच्यासोबत या घरात रहायला आवडेल. ओएमजी, त्यांच्या फोनशिवाय या घरात राहणे खूप मजेदार असेल.”

करण जोहरने अनेक शोमध्ये नमूद केले आहे की, करीना कपूरकडे बॉलिवूडच्या प्रत्येक बातम्या असतात आणि ती तिच्या फोनमध्ये बरीच माहिती ठेवते. इतकेच नाही, तर करीना तिच्या फोनवर प्रचंड सक्रिय असते. करीना, करण आणि मलायका खूप चांगले मित्र आहेत आणि बऱ्याचदा एकत्र पार्टी करताना देखील पाहायला मिळतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिया खान आत्महत्या प्रकरणाची धुरा विशेष सीबीआयच्या हातात; सूरज पांचोली म्हणाला, ‘…मला शिक्षा झालीच पाहिजे’

-करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’

हे देखील वाचा