Friday, April 19, 2024

HAPPY B’DAY | बॉलिवूडला हिट‌ सिनेमे देणारा करण जोहर वापरतो ‘ही’ आलिशान कार; किंमत वाचून फिरतील डोळे

प्रत्येक व्यक्तीला कोणत्या तरी गोष्टीचा छंद असतो. आपल्याकडे खुप महागड्या वस्तू असाव्यात, बंगला असावा किंवा गाडी असावी, असे प्रत्येकाला वाटत असते. स्वत:ची हौस पुर्ण करण्यासाठी अनेक उद्योगपती किंवा बाॅलिवूड स्टार कोट्यवधी रुपये खर्च करत असतात. तसेच प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरही (karan johar) आलिशान जीवन जगतो.

करणच्या कपड्यांपासून त्याच्या कारपर्यंत प्रत्येक गोष्ट खूप मौल्यवान आहे. स्वत:ला हवं तसं जगणं, हवं त्या गाडीत फिरायला त्याला खुप आवडतं. त्याच्याकडे कारचे कलेक्शन आहे. करणने आता त्याच्या या कारच्या कलेक्शन आणखी एक महागडी कार सामील झाली आहे. करण जोहरने नुकतीच ‘ऑडी ए ८ एल’ कार खरेदी केली आहे. या कारची किंमत १.५८ कोटी रूपये आहे.

ऑडी इंडियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करून, करण जोहरने कार खरेदी केल्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये करण जोहर त्याच्या नवीन कारच्या शेजारी उभा आहे आणि ऑडी इंडियाचे प्रमुख देखील करणसोबत दिसत आहेत.

दिग्दर्शक करण जोहर सध्या बराच चर्चेत आहे. दरम्यान, करण जोहर ८ ऑगस्टपासून ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करताना दिसणार आहे. करणने बिग बॉससाठी विशेष तयारीही केली आहे. करणच्या शोमध्ये काय नवीन काय घडणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

करण जोहरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर करण जोहर ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटानंतर पाच वर्षांनी दिग्दर्शनाकडे परतत आहे. त्याने नुकतंच त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी दिसणार आहेत. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा