Monday, July 1, 2024

बाबो! टिव्ही रिएलिटी शोमध्ये चार शब्द बोलायला कलाकार घेतात ‘इतके’ मानधन, आकडे पाहून बसेल धक्का

हिंदी सिनेजगतातील आणि छोट्या पडद्यावरील असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या महागड्या मानधनासाठी ओळखले जातात. त्यामुळेच छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार फक्त रिअलिटी शोमध्ये काम करण्यास प्राधान्य देत असतात. रिअलिटी शो होस्ट करण्यासाठी हे कलाकार मोठी रक्कम घेतात. त्यामुळेच ते मोठ्या मालिका करणे प्रकर्षाने टाळतात. या रिअलिटी शो होस्ट करणाऱ्या कलाकारांच्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. जाणून घेऊया अशाच महागड्या  कलाकारांचे मानधन. 

नेहा कक्कर (Neha Kakkar) – लोकप्रिय गायिका नेहा कक्कर इंडियन आयडॉलमध्ये परिक्षकाची भूमिका करताना दिसत आहे. नेहाच्या गाण्यांची अनेक किस्स्यांची या कार्यक्रमात जोरदार चर्चा होताना दिसत असते.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंडियन आयडॉल 12 ची जज होण्यासाठी नेहा कक्करने एपिसोड्सचे 5 लाख रुपये घेतले होते. त्यामुळे नेहा कक्कर या कार्यक्रमात दिसण्यासाठी भरमसाठ फी घेत असल्याचे दिसत आहे.

शिल्पा शेट्टी Shilpa Shetty) – हिंदी सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिल्पा शेट्टीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सहजसुंदर अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकातील तिच्या सुपरहीट चित्रपटांची आजही चर्चा होताना दिसत असते. सध्या शिल्पा अनेक रिअलिटी शो होस्ट करताना दिसत आहे. सुपर डान्सर 4 ची जज शिल्पा शेट्टी देखील फीच्या बाबतीत कमी नाही. शिल्पा शेट्टी शिल्पा शेट्टी एका एपिसोडचे 22 लाख रुपये घेते.

रोहित शेट्टी (Rohit Shetty) – बॉलिवूडचा लोकप्रिय निर्माता रोहित शेट्टीचा खतरों का खिलाडी हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच रोहित शेट्टी या कार्यक्रमासाठी मोठे मानधन घेतो.  खतरों के खिलाडी 12 चा होस्ट रोहित शेट्टीने एका एपिसोडचे 49 लाख रुपये घेतो. नवीन सीझनमध्ये कास्ट करण्यासाठी रोहित शेट्टीने त्याची फी वाढवल्याची माहितीही समोर आली आहे.

कपिल शर्मा (Kapil Sharma)- कपिल शर्मा हा लोकप्रिय  कॉमेडियन म्हणून ओळखला जातो. विनोदाचा बादशहा कपिल शर्मा त्याच्या मिश्किलपणासाठी आणि विनोदी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच जगभरात कपिल शर्माचे चाहते पाहायला मिळतात. याच प्रचंड लोकप्रियतेमुळे कपिल शर्मा मानधनही मोठे घेतो.  कपिल शर्मा शोमध्ये कॉमेडी शो होस्ट करण्यासाठी ५० लाख रुपये घेतो.

करण कुंद्रा (Karan Kundra) – करण कुंद्रा हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. करण कुंद्राही रिअलिटी शोमधून मोठी कमाई करतो. करण कुंद्रा डान्स दिवाने ज्युनियरच्या एका एपिसोडचे आयोजन करण्यासाठी 3 लाख रुपये आकारत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा