Saturday, April 20, 2024

नवीन वर्षाच्या रात्री नेहा कक्कर अन् रोहनप्रीतमध्ये घडले ‘असे’ काही, की स्टेजवरच गायिकेला कोसळले रडू

गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नवीन वर्षाच्या निमित्ताने नेहाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. २०२२ मध्ये पाऊल ठेवताना ती पती रोहनप्रीत सिंगला (Rohanpreet Singh) किती मिस करत आहे, हे या पोस्टमध्ये स्पष्टपणे जाणवू शकते. नेहाने या पोस्टमध्ये सांगितले आहे की, रोहनप्रीत आणि ती दोघेही नवीन वर्षाच्या निमित्ताने एकत्र नव्हते. यामुळे जेव्हा ती स्टेजवर परफॉर्म करत होती तेव्हा ती रडू लागली. याबद्दल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

नेहाने रोहनप्रीत सिंगसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, “मला तुझी खूप आठवण येत आहे, हा फोटो गेल्या वर्षी क्लिक केला होता आणि काल रात्री आपण एकत्र नव्हतो. कारण रोहू पहलगाम काश्मीरमध्ये आणि मी गोव्यात परफॉर्म करत होते. काल रात्री १२ वाजता मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या परफॉर्मन्समुळे ते होऊ शकले नाही. त्यामुळे मी स्टेजवरच भावूक झाले आणि मी रोहूला याबद्दल सांगितले नाही, कारण मला यापूर्वीही एकदा स्टेजवर रडल्यामुळे लाजिरवाणे वाटत आहे. खूप भावूक झाल्यामुळे मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. कारण रोहू माझ्यासोबत नव्हता आणि मला त्याला घट्ट मिठी मारून नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. पण वर्षाच्या शेवटच्या दिवशी आम्ही दोघे काम करत होतो आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत होतो याचा मला खरोखर आनंद आहे.”

तिने पुढे लिहिले, “बेबी मी आज तुला भेटण्यापासून स्वतः ला थांबवू शकत नाही. तू माझ्यापर्यंत पोहोचण्याची वाट पाहत आहे. लव्ह यू माय ड्रीम हजबँड, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि माझ्या #NeHearts मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.”

नेहा कक्कर २४ ऑक्टोबर २०२० रोजी रोहनप्रीत सिंगसोबत विवाहबंधनात अडकली. दोघांच्या वयात खूप अंतर आहे, पण प्रेम असेल तेव्हा वयाच्या अंतराचा काहीच फरक पडत नाही. दोघे अनेकदा त्यांचे प्रेमाने भरलेले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

हेही वाचा-

हे देखील वाचा