Monday, February 24, 2025
Home कॅलेंडर अक्षराचा ‘नैतिक’ बनत घराघरात पोहोचला करण मेहरा; बॉलिवूडच्या दिग्गज डायरेक्टरसोबतही केलंय काम

अक्षराचा ‘नैतिक’ बनत घराघरात पोहोचला करण मेहरा; बॉलिवूडच्या दिग्गज डायरेक्टरसोबतही केलंय काम

टीव्ही दुनियेतील ‘नैतिक’ या नावाने घराघरामध्ये आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे करण मेहरा. याने ‘ये रिश्ता क्या केहलाता हैं’ या मालिकेमधून टीव्ही दुनियेतील एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने मालिकेसोबतच बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारासोबत चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. शनिवारी (दि. 10 सप्टेंबर) दरवर्षीप्रमाणे तो आपला वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी जाणून घेऊया करण मेहराच्या आयुष्यातील रंजक गोष्टी…

अभिनेता करण मेहरा (Kran Mehra) याचा जन्म 10 सप्टेंबर, 1982 साली पंजाबमधील जालंधरमध्ये झाला होता. यानंतर त्यांचे कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक झाले. त्याने एनआयएफटीमधून डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याने शिक्षण घेत असताना ट्रेनी डॉमिनोज पिज्जामध्ये देखील काम केले आहे. या व्यतिरिक्त करण मेहराने मॉडेलिंग, फॅशन डिझायनिंगही पूर्ण केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Mehra (@realkaranmehra)

‘या’ दिग्गज चित्रपट निर्मात्यासोबत केले होते काम
माध्यमांतील वृत्तांनुसार, करण मेहरा पहिल्यांदा मुंबईला आल्यावर त्याने चित्रपट निर्माता राजकुमार हिराणी आणि राम गोपल वर्मा यांचा सहाय्यक म्हणून काम केले होते. याचा त्याला फादा झाला आणि त्याला चार चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. या सोबतच त्याने अभिनयाचे धडेही घेतले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Mehra (@realkaranmehra)

या मालिकेतून पोहोचला घराघरात
करण मेहराने 2008 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘लवस्टोरी 2050’मध्ये देखील काम केले होते. यानंतर त्याला टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘नैतिक’च्या भूमिकेसाठी ऑफर मिळाली. या कार्यक्रमामुळे करण मेहराला घराघरात ओळख मिळाली. या कार्यक्रमामध्ये त्याने 7 वर्ष काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Mehra (@realkaranmehra)

वैयक्तिक आयुष्य
करण मेहराने टीव्ही अभिनेत्री निशा रावल हिच्यासोबत लव्हमॅरेज केले होते. त्यांना 2017 मध्ये एक मुलगाही झाला. मात्र, या दोघांच्या नात्यामध्ये वादविवाद सुरू झाल्याने त्यांनी आपले रस्ते वेगळे केले. करण मेहरा लवकरच लोकप्रिय रियॅलिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘लगता है हातों में रह गये तेरे हात’, शहनाझच्या गाण्याने चाहत्यांना आली सिद्धार्थची आठवण
रितेश देशमुखने अभिनेता करण जोहरला खेचले कोर्टात, पाहा काय आहे प्रकरण
बापरे! सोनू सूदला चाहत्याने दिले रक्ताने बनवलेले पेंटिंग, अभिनेत्याने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

हे देखील वाचा