करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात सुखात आहे. नुकतेच करीनाने दुसऱ्यांदा एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. 2016 मध्ये करीना पहिल्यांदा आई झाली होती.करीना आणि सैफने त्यांच्या मुलाचे नाव ‘तैमूर अली खान पटौदी’ असे ठेवले आहे. 2012 मध्ये ते दोघांचा विवाह संपन्न झाला होता आणि तिथून त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाला सुरूवात झाली.
करीनाच्या आधी सैफ अलीने अमृता सिंगसोबत लग्न केले होते. परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचं लग्न टिकले नाही. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे करीना त्या दोघांच्या लग्नाला गेली होती आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्यावेळी करीना खूपच लहान होती.
ऑक्टोंबर 1991 मध्ये सैफ अली खान आणि अमृता यांचं लग्न झालं होत. त्यावेळी करीना केवळ 11 वर्षाची होती. ती त्यावेळी सैफ आणि अमृताच्या लग्नाच्या गेली होती आणि तिने त्यांना शुभेच्छा ही दिल्या होत्या. परंतु 2004 मध्ये काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचा घटस्फोट झाला आणि ते दोघेही वेगळे झाले. अमृता आणि सैफ यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ‘सारा अली खान’ आणि ‘इब्राहिम अली खान पटौदी’ ही त्यांची नावे आहेत.
सैफ आणि करीनाबद्दल बोलायचे झाल्यास, त्या दोघांची पहिली भेट ‘ओमकारा’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी त्यांची फक्त ओळख झाली होती. ‘जब वी मेट’ या चित्रपटादरम्यान करीना आणि तिचा बॉयफ्रेंड ‘शाहिद कपूर’ यांचं ब्रेकअप झाले होते. त्यानंतर ‘टशन’ या चित्रपटादरम्यान ती आणि सैफ अली खान एकमेकांच्या जवळ आले. त्यांनतर ते बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ते लिव्हइन रिशनशिपमध्ये देखील राहिले. 2012 मध्ये त्यांनी लग्न केले आणि आपल्या नात्याला नाव दिले.