Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

बॉलिवूडमधील क्यूट जोडी म्हणजेच सैफ अली खान आणि करिना कपूर-खान हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. करिना कपूर ही लवकरच आई होणार अशी चाहूल तिच्या चाहत्यांना लागलीच होतीच. याचे कारण काल (शनिवार) सायंकाळीच तिला मुबंईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

प्राप्त माहितीनुसार आज (दिनांक २१ फेब्रुवारी, रविवार) रोजी सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास करिनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. आणि पतौडी खानदानात नव्या पाहुण्याचे आगमन झाले. करिनाचे दुसरे अपत्य हा देखील मुलगाच असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे सैफ आणि करिना हे दोन युवराजांचे पालक बनल्याचे आता निश्चित झाले आहे. करिनाला मुलगा झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरताच या जोडीवर चोहोबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.

सैफ आणि करिनाचे २०१२ मध्ये लग्न झाले. ‘टशन’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दिनांक २० डिसेंबर २०१६ रोजी करिनाने पहिल्या मुलाला म्हणजेच तैमुरला जन्म दिला. त्यानंतर आता ते दोघे दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत.

दुसऱ्या बाळाच्या जन्माआधी सैफ आणि करिना नवीन घरात शिफ्ट झाले होते. गरोदरपणाच्या काळातही करिना चित्रपटाचे शूटिंग, जाहिरातींसाठी काम करत होती.

हे देखील वाचा