Saturday, June 29, 2024

करीना कपूर आणि तैमूर आहेत ‘सुपर डान्सर ४’ शोचे मोठे चाहते; म्हणाली, ‘आम्ही दोघे शो खूप एंजॉय करतो’

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खानने नुकतच एक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, ती आणि तिचा मुलगा तैमूर अली खान ‘सुपर डान्सर ४’ चे चाहते आहेत. या शोमध्ये करीनाची बहिण अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जागी आली आहे. त्यावेळी करीनाला खास फोन केला गेला. तेव्हा करीनाने हे सर्व सांगितले आहे.

शो दरम्यान परी नावाच्या एका कंटेस्टेंटने करिश्माला तिच्या डान्सने आणि करीनाबद्दल तिच्या मनात असलेल्या क्यूरोसिटीने इंप्रेस केले. त्यामुळे करिश्माने करीनाला कॉल करण्याचा निर्णय घेतला. करीना पाच वर्षांच्या या डान्सरला म्हटली की, “मी तुझी फॅन आहे, कारण मी तुझे डान्स पाहिले आहेत आणि तू काय डान्स करतेस!” अशा शब्दांत करीनाने परीचे कौतुक केले आहे. (kareena kapoor and taimur ali khan are fans of super dancer 4 said we both enjoy the show together)

पुढे करीना म्हणाली की, “कदाचित मी तिथे असते तर, मला तुझा डान्स प्रत्यक्ष पाहता आला असता. मी सुपर डान्सची चाहती आहे. कारण या शोमध्ये खूप टॅलेंटेड कंटेस्टेंट्स आहेत. परी, तू माझं मन जिंकलं आहेस. तैमूरला सुद्धा सुपर डान्स शो खूप आवडतो. तो देखील तुझा फॅन आहे. आम्ही दोघेही सुपर डान्स ४ शो खूप एन्जॉय करतो.” असे करीना म्हणाली आहे.

 

या एपिसोडमध्ये करिश्माने करीनाबरोबर तिच्या बालपणाविषयी सांगितले की, “आम्ही दोघी एकमेकींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहोत. मी खूप भोळी होते. करीना खूपच खोडकर होती. लहानपणापासूनच करीना खूप हुशार होती. तिला नॉलेजची प्रचंड आवड होती. ती लहापणीपासूनच प्रत्येक गोष्टीकडे नॉलेज मिळवण्यासाठी लक्षपूर्वक बघत असायची.” असे तिने सांगितले.

करिश्मा पुढे म्हणाली, “मला शाळेमध्ये डान्स, डिबेट, कॉम्पटीशन्स या सर्व गोष्टींची खूप आवड होती. मी खूप स्पोर्टी आणि आर्टिस्टिक होते. मात्र, आपण सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु, आपण आपल्या हॉबीज देखील पूर्ण केल्या पाहिजे. मला असे वाटते की, मी देखील हेच केले आहे.” असे करिश्मा ने सांगितले आहे.

करीना कपूरला शेवटी ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटात पाहिले होते. त्या चित्रपटात इरफान खान मुख्य भूमिकेत होता. करीनाकडे सध्या ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट आहे. त्यामध्ये ती आमिर खान सोबत दिसणार आहे. दुसरीकडे, करिश्माने २०२० मध्ये ‘मेंटलहुड’ या डिजिटल सिरीजद्वारे अभिनयात पुनरागमन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा